डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये पुन्हा प्रदूषण,उग्र वासाने नागरिक हैराण

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील मिलापनगर, सुदामानगर, सुदर्शननगर मध्ये काही दिवसांपासून प्रदूषण वाढले असून रात्री ते सकाळ पर्यंत मोठ्या प्रमाणात प्रदूषणामूळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. या केमिकलच्या उग्र वासाने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याच बरोबर डोळ्याची जळजळ होणे हा त्रासही नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत होता. त्या मुळे नागरिक हैराण झाले होते.याबद्दल येथील रहिवाशी यांनी समाज माध्यमांवर आपल्या तिखट प्रतिक्रिया देत आहेत. मंगळवारी रात्री दहा वाजल्यानंतर बुधवारी सकाळ पर्यंत प्रदूषणाचा फटका रहिवाशांना बसला असून त्यांनी याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाकडे ईमेल, एसएमएस, फोन द्वारे आपल्या तक्रारी दाखल केल्या असून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उपप्रादेशिक अधिकारी संजय भोसले यांनी याबद्दल नागरिकांना फोन करून त्यांनी केलेल्या तक्रारी बद्दल चौकशी केली. उग्र्वास कशामुळे येत आहे याची शोधाशोध दिवस भर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक करत होते. पण त्याचा हाती काही ठोस असे मिळाले नाही. त्यामुळे या उग्र वासाचे नेमके कारण समजू शकले नाही. सामाजिक कार्यकर्ते राजु नलावडे व कामाचे अध्यक्ष देवेन सोनी यावेळी उपस्थित होते.

प्रदूषण करण्यावर कार्यवाही करू असे आश्वासन त्यांनी जरी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने दिले आहे तरी पण डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात प्रदूषण वाढले असून त्याचा नाहक त्रास दर वेळी येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांन मध्ये संतापाचे वातावरण आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web