सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण

डोंबिवली/प्रतिनिधी – हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात येणाऱ्या नागरिकांना आणि दुपारच्या सुमारास या मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना आल्हाददायक वातावरण मिळावे या उद्देशाने या क्रीडा संकुलामध्ये गुलमोहराच्या विविध जातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आल्याची माहिती डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. भाजपतर्फे श्याम प्रसाद मुखर्जी यांचा जन्मदिवस ते पुण्यतिथी कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो. त्याच अनुषंगाने डोंबिवलीतील हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात गुलमोहराची ५६ झाडे लावण्यात आली.

गुलमोहराच्या झाडांमुळे या परिसरात सावली निर्माण होईल. ही झाडे टिकावी म्हणून याठिकाणी पाण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. मैदानात टाकण्यात आलेल्या डब्रिजमुळे या मैदानाची दुरवस्था झाली आहे ती दूर करण्याच्या दृष्टीने लवकरच मातीचा थर टाकण्यात येणार असून मैदान सुरक्षित ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी आमदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कल्याण डोंबिवली महानगपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, महिला मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी, डॉ. सुनीता पाटील, निलेश म्हात्रे, मंदार हळबे, मुकुंद पेडणेकर, नितीन पाटील, संदीप पुराणिक, मिहिर देसाई, निलेश पेडणेकर, नंदू जोशी, प्रदीप चौधरी, जितेंद्र पाटील, नंदू परब, महिला पदाधिकारी वर्षा परमार, पूनम पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web