युरोप खंडातील सर्वोच्च शिखर- माऊंट एलब्रूस मोहिमेवर ३६० एक्सप्लोरची टीम रवाना

पुणे /अशोक कांबळे – युरोप खंडातील सर्वोच्च शिखरावर निघालेल्या 360 एक्सप्लोरर मार्फत आयोजित कोव्हिड नंतरच्या पहिल्या भारतीय मोहीमेचा आमदार सुनील आण्णा शेळके व जेष्ठ गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ होऊन युरोप खंडातील सर्वोच्च शिखर- माऊंट एलब्रूस मोहिमेवर 360 एक्सप्लोरची टीम रवाना झाली.नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणार पहिला आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे त्यांच्या इतर साथीदारांसोबत 360 एक्सप्लोरर मार्फत युरोप खंडातील सर्वोच्च शिखर- माऊंट एलब्रूस मोहिमेवर जात आहेत.

मावळचे प्रसिद्ध आमदार सुनील अण्णा शेळके व 360 एक्सप्लोरर चे लीडर आनंद बनसोडे यांचे गुरू गुरू व महाराष्ट्र शासनाच्या साहसी खेळासाठी सतत मार्गदर्शन करणारे व महाराष्ट्र्रात सर्वात जास्त एव्हरेस्टवीर घडवणारे जेष्ठ गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांच्या उपस्थितीत यूरोप खंडाच्या मोहिमेचा फ्लॅग ऑफ करण्यात आला. 360 एक्सप्लोरर ची टीम पुढील काही दिवसात रशियातील 18,510 फूट उंच माउंट एलब्रूस शिखरावर चढाई करून कोव्हिड नंतरची पहिली भारतीय टीम बनणार आहे. ही मोहिम युनायटेड नेशन्स च्या sustainable developement गोल्स ला समर्पित असून जगभरात साहसी खेळ प्रसारासाठी आयोजित करण्यात आली आहे. मोहिमेचे नियोजन एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यामार्फत केले गेले आहे. यावेळी अल्तमश सैय्यद, स्वप्निल शेवकर, अतुल साबळे हे उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web