कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग आढळल्याने कर्मचाऱ्यांची पळताभुई थोडी झाली. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हाँलीरोड नजीक असलेल्या मोहन अल्टी जा या सेल्स् आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये मंगळवारी साडेचार फुटी नाग दिसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भितीने धादंल उडाली. सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्र म्हणून काम करीत असलेल्या सिध्दी गुप्ता या युवतीने नागाला पकडल्याचे पाहुन उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला “पकडलेल्या साडे चार फुटी लांब विषारी नागाला, वन विभागाच्या ताब्यात देऊन नागास जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे सर्पमित्र सिध्दी गुप्ता यांनी सांगितले .