मानव अधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी पत्रकार संजय आठवले यांनी निवड

सोलापूर/प्रतिनिधी – देशभरात कार्यरत असलेल्या मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मुलन संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी मोहोळ येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संजय आठवले यांची निवड करण्यात आली.यावेळी नियुक्तीचे पत्र मोहोळ येथे संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतिश केदारी यांनी दिले.

पत्रकार संजय आठवले गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे.त्यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांची निवड केली आहे.

नियुक्तीचे पत्र मोहोळ येथे येऊन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश केदारे यांनी दिले.यावेळी किरण शिंदे गुरुजी दहिसर,हॉटेल उद्योजक गुप्ता पुणे,महाराष्ट्र सचिव कुमार ढवळे,तक्षशिला मंडळाचे अध्यक्ष शशिकांत ठोकळे,तक्षशिला सोसायटीचे सेक्रेटरी सुनील गायकवाड आदी उपस्थित होते

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web