डोंबिवलीत लवकरच अद्ययावत वातानुकूलित अभ्यासिका उभी राहणार,विद्यार्थ्यांना होणार लाभ

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – डोंबिवलीत रेल्वे स्थानकाजवळ जुन्या विष्णू नगर पोलीस ठाण्याजवळ वातानुकूलित साउंडफ्रुप अद्ययावत अभ्यासिका उभारण्यात येत असल्याने, आदर्शवत काम समाजापढे उभे राहणार आहे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून कर्जत ते घाटकोपर परिसरातील युवकांना स्पर्धा परीक्षा तसेच विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळणार आहे. येथील अभ्यासिका एकप्रकारे युवकांना प्रेरणा देणारी असून, यामधून चांगले विद्यार्थी घडतील, असा आशावाद कल्याण डोंबिवली पालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती दिपेश म्हात्रे यांनी व्यक्त केला.

सुमारे २५०० स्वे.फूट क्षेत्रात हि अभ्यासिका निर्माण होत असून ,या अभ्यासिकेत १०० ते १५० विध्यार्थ्यांना बसण्याची सोय करण्यात येणार आहे. आभ्यासिका स्टेशन परिसरात असल्याने बाहेरील वाहनांचा आणि रहदारीच्या आवाजाने विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी अभ्यासिका साऊंड प्रूफ असणार आहे. त्यासोबत विद्यार्थ्यांना सोयीसाठी वाय फाय , लँपटाप, ई संदर्भ ग्रंथालय उपलब्ध करुन देणार आहे.डोंबिवली ग्रंथालयाकडे या अभ्यासिकेची जबाबदारी देण्यात आली आहे. सुभाष मुंदडा याचं काम पहाणार आहेत.कल्याण डोंबिवली पालिकेने या अभ्यासिकेच्या कामासाठी ४० लाख रु.ची तरदूत केली आहे. दिवसभर अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळेस डबा खाण्यासाठी विशेष जागा, तसेच वाँश बेसीनची,स्वच्छता ग्रुहाची व्यवस्था अभ्यासिका लगत करण्यात येणार आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web