डोंबिवलीच्या नाहर रुग्णालयाची सामाजिक बांधिलकी, ५३ रुपयात बेड चार्जेस संकल्पना

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कोरोनाच्या टाळेबंदीमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून कोरोनाच्या उपचारार्थ पैशाची चणचण निर्माण झाली आहे, अश्या गोरगरीब रुग्णांना डोंबिवली येथील नाहर मल्टीस्पेशिलिटी रुग्णालयाने अवघ्या ५३ रुपयात बेड चार्जेस (`( डॉक्टर, नर्सिंग,आर.एम.ओ.चार्जेस ) उपलब्ध करून दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त नाहर मल्टीस्पेशिलिटी रुग्णालयचे संस्थापक तथा मनसे कल्याण शीळचे विभागाध्यक्ष दिनेश पाटील यांनी सात दिवसांसाठी ५३ रूपयांत बेड सेवा उपलब्ध केली आहे. डोंबिवली आणि परिसरातील अनेक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून राज्यातील इतर खाजगी कोविड रुग्णालयात अश्या प्रकाराची रुग्णसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यपाल कोश्यारीं यांच्या कडे नाहर रुग्णालयाच्या वतीने मागणी करण्यात येणार आहे.याबाबत माहिती देण्यासाठी रुग्णालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

यावेळी डॉ.वैभव सिंग, डॉ.हरिश साळुंखे,डॉ. कुणाल गायकर आदी उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापक जांभळे म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी खाजगी रुग्णालयामध्ये ५ बेड गोरगरीब रुग्णांसाठी अल्प दरात उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी रुग्णालयाचे व्यवस्थापक अरूण जांभळे यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १४ जून पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना २१ जून र्पयत सुरू राहणार आहे.या सात दिवसांच्या कालवधीत येणाऱ्या सर्वच कोविड रुग्णांना ही सेवा देण्यात येणार आहे.कोरोना काळात गरीबांना थोडा फार का होईना दिलासा मिळावा यासाठी आम्ही ही योजना आणली आहे.यापूर्वी ही रुग्णालयांनी अनेक प्रकारे रुग्णांना मदत केली आहे.ही संकल्पना राज्यात राबविण्यासाठी केवळ इच्छाशक्तीची गरज आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी यांनी सर्व खाजगी रुग्णालयांना आवाहन केले. तर एखाद्या रुग्णालयात शंभर बेड आहेत.त्यातील पाच बेड कोरोना रुग्णासाठी कमी दरात उपलब्ध करून देण्यास काहीच हरकत नाही.

नाहर रुग्णालयात ५३ रूपये बेड दरामध्ये डॉक्टरांचे तपासणी दर, बेड दर नर्सिंग यांचे दर लावण्यात आले आहेत. अतिदक्षता विभाग आणि वॉर्ड अशा दोन्हीसाठी ही सेवा देण्यात आली आहे. सध्या कोविडचे दोन रूग्ण या योजनेखाली उपचार घेत आहेत असे सांगितले.डॉ.वैभव सिंग म्हणाले, कोरोना काळात सर्वानी कोरोना नियमावलीचे तंतोतत पालन केल्यास तिस:या लाटेत रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल. ज्येष्ठांपासून लहान मुलांना र्पयत सर्वाचेच लसीकरण होणो आवश्यक आहे. कोरोना महामारी नियंत्रित आणण्यासाठी सरकारने डॉक्टरांचे मार्गदर्शन घेऊन काम केले पाहिजे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन सिलेंडरच्या किंमती गगनाला भिडल्या असताना आम्ही त्यांच्या किंमती रुग्णाला परवडणाऱ्या ठेवल्या होत्या. कोरोना काळात ऑक्सिजन सिलेंडर किंवा औषधोपचारांचा काळाबाजार हा कोणताही डॉक्टर अथवा रुग्णालय करीत नव्हते. यावर नियंत्रण ठेवणो सरकारचे काम होते.

 
Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web