डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र,पदाधिकाऱ्यांची झाली घोषणा

मुंबई/प्रतिनिधी -डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली्.संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी तुळशीदास भोईटे (मुंबई) तर सचिवपदी नंदकुमार सुतार(पुणे), राष्ट्रीय समन्वयकपदी राजू वाघमारे (पुणे), सहसचिवपदी केतन महामुनी(पुणे) यांची निवड करण्यात आली आहे.विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख (नागपूर), उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी शिर्के (अहमदनगर), मराठवाडा अध्यक्षपदी डॉ.रेखा शेळके (औरंगाबाद), कोकण अध्यक्षपदी सागर चव्हाण (सावंतवाडी) तर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी सुरवसे(सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे.
डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच घटकांचे हित जोपासणे आणि पत्रकारिता व सामाजिक मूल्यांचे जतन करत या क्षेत्राच्या गुणात्मक विकासासाठी स्थापन झालेल्या या संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार म्हणून ज्येष्ठ संपादक व विचारवंत अरुण खोरे हे कार्यरत आहेत.संघटनेच्या राज्यातील काही पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली. पदाधिकाऱ्यांची नावे अशी,
राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश वांदिले(मुंबई), मोहन राठोड (पुणे), किशोर मरकड (अहमदनगर),सविता कुलकर्णी (नागपूर), दिपक नलावडे (ठाणे), प्रमोद मोरे(कोल्हापूर) पद्माकर कुलकर्णी (सोलापूर), संतोष सूर्यवंशी (बार्शी), राज्य कायदा सल्लागार एड.अतुल पाटील (पुणे),प.महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल उंबरे (पंढरपूर), सरचिटणीस नितीन पाटील (पुणे), मराठवाडा उपाध्यक्ष दिलीप माने (परभणी), सरचिटणीस देव शेजूळ (औरंगाबाद) सोशल मिडिया प्रसिद्धी राज्य समन्वयक मोसिन शेख(औरंगाबाद),सहसमन्वयक सचिन डाकले (नवी मुंबई).
शामल खैरनार (पुणे शहर अध्यक्ष) महेश कुगांवकर(सचिव), डॉ.बिनू वर्गीस (ठाणे जिल्हा अध्यक्ष), संतोष मानूरकर (बीड जिल्हा अध्यक्ष), प्रशांत चुयेकर( कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष),
डॉ.सुनिल पाटील, इस्लामपूर ( सांगली
जिल्हा अध्यक्ष), सतीश सावंत, सांगोला (सोलापूर जिल्हा अध्यक्ष), शंकर जाधव (सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष), विजय बाबर (सोलापूर शहर अध्यक्ष)प्रा.सतीश मातने (उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष), विनायक कलढोणे(इचलकरंजी अध्यक्ष),अजय ऊर्फ पिंटू पाटील (बार्शी तालुका अध्यक्ष),सत्तार शेख (जामखेड तालुका अध्यक्ष).

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web