सोलापूर/अशोक कांबळे – राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारें घाटणे गावचे सरपंच यांनी चुकीची माहिती देऊन प्रशासन व गावकऱ्यांची दिशाभूल केल्याची तक्रार गटविकास अधिकारी मोहोळ यांच्याकडे घाटणे गावचे ग्रामपंचायत सदस्य खेलू माने यांनी केली होती.तसेच सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी मोहोळ पंचायत समितीच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू केले होते.या उपोषणाची गटविकास अधिकारी यांनी दखल घेत ग्रामपंचायतीने कोरोना विषयक केलेल्या कामांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात येत असल्याचे पत्र उपोषण कर्त्यांना देण्यात आले आहे.
उपोषण कर्त्यांना दिलेल्या पत्रात गटविकास अधिकारी यांनी म्हटले आहे की, मौजे घाटणे ग्रामपंचायतीने आर ओ प्लांट व ग्रामपंचायत दुरुस्ती या कामाचे इस्टीमेट तक्रारदार यांना या स्तरावरून देण्यात येत आहे.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रकार परिषदेमध्ये घाटणे गावच्या सरपंचाने गाव कोरोना मुक्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजनाचे कौतुक केले होते.याबाबतची माहिती या कार्यालयाकडून देण्यात आली नव्हती.परंतु ग्रामपंचायतीमध्ये कोरोना विषयक कामांची तपासणी करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी पाथरुटकर.वैद्यकीय अधिकारी नरखेड प्रा.आ.केंद्र बंडगर व विस्तार अधिकारी ए.एम.वाघमोडे यांच्यामार्फत चौकशी करून अहवाल आपणास देण्यात येईल असे पत्रात गटविकास अधिकारी यांनी म्हटले आहे.