कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने दिव्यांग नागरिकांचे लसीकरण

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी लसीकरण सुरु करण्यात आले आहे मात्र दिव्यांग नागरिकांना लसीकरणसाठी खूप अडचणी येत होत्या. दिव्यांगा मधील काही असे नागरिक आहेत की त्यांना निट चालणे सुद्धा कठीण होत आहे. ते पूर्णपणे आपल्या दुसऱ्यावर अवलंबून आहेत. असे नागरिक लसीकरणासाठी रांगेत उभे राहू शकत नाही. किवा लसीकरण केंद्रावर स्वतः येऊ शकत नाही. त्याच बरोबर अनेक संघटनांनी पालिकेकडे या बाबत पत्र देखील दिले होते.या सगळ्याचा विचार करून केडीएमसी प्रशासनाने कल्याण डोंबिवली क्षेत्रातील दिव्यांग नागरिकांनसाठीच विशेष लसीकरण मोहीमेचे आयोजन कल्याणच्या अत्रे रंगमंदिर नाट्यगृह तर डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात केले होते .त्यानुसार १८ वर्षावरील दिव्यांग नागरिकांनी या लसीकरण मोहिमेस चागल्या प्रकारे प्रतिसाद दिला. व आपले लसीकरण करून घेतले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web