ठाणे जिल्हात यंदाही धबधबे, तलाव,धरण परिसरात मनाई आदेश लागू

ठाणे/प्रतिनिधी – कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात यावर्षीही जिल्हाधिकाऱ्यांकडून धबधबे, तलाव, धरण परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग आणि प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व धबधबे,तलाव, धरण परिसरात एकत्र येण्यास मनाई केली आहे.

पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक विविध पिकनिक स्पॉटवर गर्दी करत असतात. या ठिकाणी जिवितहानी होण्याच्या घटना घडल्या असून सामाजिक अंतर पाळणेही शक्य नाही. पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी आणि कोणत्याही प्रकारची जिवीतहानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. 8 जूनपासून पुढील आदेश देईपर्यंत हे मनाई आदेश लागू असणार आहेत.

“ठाणे जिल्ह्यात याठिकाणी मनाई आदेश लागू…”

ठाणे तालुक्यातील येऊर धबधबे, सर्व तलाव, कळवा मुंब्रा रेतीबंदर, मुंब्रा बायपास येथील सर्व धबधबे, गायमुख रेतीबंदर, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरी किनारा…

मुरबाड तालुक्यातील सिध्दगड डोंगर, नाव्हे, सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे डॅम, माळशेत घाटातील सर्व धबधबे,पळू, खोपवली, गोरखगड, सिंगापुर नानेघाट, धसई डॅम, आंबेटेवे मुरबाड…

शहापूर तालुक्यातील भातसा धरण स्थळ, कुंडन दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत(डोळखांब), सापगांव नदीकिनारा, कळंवे नदी किनारा, कसारा येथील सर्व धबधबे…

कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट चौपाटी…

भिवंडी तालुक्यातील नदीनाका, गणेशपुरी नदी परिसर…

अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाडे, दहिवली, मळीची वाडी…

“असा आहे मनाई आदेश…”

पावसामुळे वेगाने वाहणाच्या पाण्यात उतरणे,

खोल पाण्यात उतरणे- त्यामध्ये पोहणे,

धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे,

पावसामुळे धोकादायक झालेल्या ठिकाणी, धबधबे, दऱ्याचे कठडे,

धोकादायक वळणे याठिकाणी सेल्फी काढण्यास आणि कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यास मनाई..

पावसामुळे निमार्ण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास

मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करण्यास, मद्य बाळगणे- मद्यवाहतुक करणे,

अनाधिकृत मद्य विक्री करणे आणि उघडयावर मद्यसेवन करणे

वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे

वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे

सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या-प्लॅस्टिकच्या बाटल्या, थर्माकोल, साहित्य उघडयावर इतरत्र फेकणे.

सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे,

महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिश हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.

सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे,
डिजे सिस्टम वाजविणे, गाडीमधील स्पिकर / वूफर वाजवून ध्वनीप्रदुषण करणे.

ध्वनी, वायु आणि जलप्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे

धबधब्याच्या १ किलोमीटर परिसरात दुचाकी, चारचाकी आणि सहाचाकी वाहनांना प्रवेश करणेस मनाई करणेत येत आहे. (अत्यावश्यक सेवा वगळता)

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web