सोलापूर/प्रतिनिधी – कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मोहोळ पोलीस पेट्रोलिंग करीत असताना हॉटेल सागरमध्ये विदेशी दारूची विक्री होत असल्याचा संशय पोलिसांना आला.यावेळी हॉटेलची तपासणी केली असता अवैद्य विदेशी दारूचा साठा मिळून आला.या तपासणीत एकूण १४ लाख ४१ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती मोहोळ पोलिसांनी दिली.
याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना हॉटेल सागर मध्ये दारू विक्री होत असल्याचा संशय आल्याने सदरचे हॉटेल चेक केले असता हॉटेल सागर मध्ये ८३ हजार ४१० रुपये किमतीचा विनापरवाना विदेशी दारूचा साठा मिळून आला.तसेच एक संशयित रित्या मिळून आलेली कार एम एच १३ डी एम ९७७७ तपासली असता त्या मध्ये ७ हजार ६८० रु ची विदेशी दारू व वाहूतुकीकरिता वापरलेली कार ची किंमत अंदाजे १३ लाख ५० हजार रुपये किंमतीचा असा एकूण १३ लाख ५७ हजार ६८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच वेगवेगळया ठिकाणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण १४ लाख ४१ हजार ९० रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील संशयित आरोपी सागर अनंत लेंगरे रा.सुळे नगर मोहोळ,केशव बळीराम माळी रा. मोहोळ, सज्जन किसन चवरे रा. पेनूर ता मोहोळ यांच्या विरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक अशोक सायकर,पो. हे. का.निलेश देशमुख,पो.ना.शरद ढावरे पो.का.पांडुरंग जगताप चालक शिवणे यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या आदेशान्वये व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.