मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल

मुंबई/प्रतिनिधी – मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि एशियाटिक सोसायटी, मुंबई या संस्थेकडे असलेल्या दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी या दोन्ही संस्थांना प्रत्येकी ५ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

श्री.सामंत म्हणाले, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय या ग्रंथालयाची स्थापना दिनांक १ ऑगस्ट, १८९८ साली झाली. सद्य:स्थितीत हे ग्रंथालय शासनमान्य “जिल्हा -अ” वर्ग ग्रंथालय म्हणून कार्यरत आहे. या ग्रंथसंग्रहालयामध्ये १,९३,४०० इतकी ग्रंथ संख्या असून दोलामुद्रिते ५,००० आहेत. या ग्रंथालयामध्ये हस्तलिखित पोथ्या, विविध लेखकांचे साहित्य, हस्ताक्षरे यांचा संग्रह असून त्यांचे जतन, संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेता या दुर्मीळ ग्रंथांचे व हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी रूपये ५ कोटी विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई एशियाटीक सोसायटी या संस्थेची स्थापना १८०४ साली झाले. सन १९५० मध्ये राज्य शासनाने राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाची स्थापना करुन एशियाटीक सोसायटीस राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचे काम बघण्यास निर्देश दिले होते.  एशियाटीक सोसायटी ही संस्था २०० वर्षापूर्वी स्थापन झालेली असल्यामुळे या संस्थेकडे असलेल्या दुर्मीळ  ग्रंथांचे व हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी सन २०१५-१६ मध्ये राज्य शासनाकडून रु. ५.०० कोटी अनुदान मंजूर करण्यात आले होते. याच कामाचा  भाग-२ म्हणून एशियाटिक सोसायटी, मुंबई या संस्थेकडे असलेल्या दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित यांचे डिजीटायजेशन करण्यासाठी रु. ५.०० कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web