आर्थिक विवंचनेतून कुटुंबावर पोटच्या मुलाला विकण्याची वेळ, महिला एजंटसह आई वडिलांना अटक

कल्याण प्रतिनिधी – कजर्बाजारी त्यात लॉकडाऊनमुळे रिक्षा चालवून फारसा पैसे मिळत नाही. तर आई वडिलांनी थेट पोटच्या मुलाला एका महिला एजंटला विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ठाणे  मानवी तस्करी विरोधी विभागाने कारवाई करीत तिघांना गजाआड  केली आहे. महिला एजंट मानसी जाधव हिने आत्तार्पयत गरीब कुटुंबियांच्या गरीबाचा फायदा घेत अशी मुले विकत घेतली आहे. याचा तपास पोलिस करीत आहेत. या घटनेने कोरोना महामारीची भीषणता  वास्तव्य स्वरूप दिसत आहे                                        

ठाणे  मानवी तस्करी विरोधी विभागाचे प्रमुख अशोक कडलक यांना माहिती मिळाली की, बदलापूर येते राहणारी मानसी जाधव ही महिला एका गरीब कुटुंबांतील पाच महिन्याच्या मुलाला विकत घेत आहे. पोलीस पथकाने कल्याण पश्चिमेतील दीपक हॉटेल येथे सापळा रचला. मुलाचे वडिल साईनाथ भोईर आई पल्लवी भोईर आणि महिला एजंट मानसी जाधव याना रंगेहाथ अटक केली या तिघांना महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलिस ठाण्याचे एपीआय सचीन पत्रे करीत आहेत. या तिघांना कल्याण न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिघांना २५ मे र्पयत पोलिस कोठडी सुनावली आहे. मूळचे मुरबाडचे राहणारे साईनाथ भोईर पत्नी आणि तीन मुले आणि तीन मुलींसोबत शहाडला राहतात. रिक्षा चालवून ते त्यांचा उदरनिर्वाह करीत होते. लॉकडाऊनमुळे त्यांच्या डोक्यावर कर्ज झाले होते. तसेच लॉकडाऊनमुळे रिक्षाचा धंदा नाही. त्यामुळे पत्नी मुला बाळांचे पोट कसे भरायचे असा प्रश्न त्यांना सतावत होता. या विवंचनेतून त्यांच्या संपर्कात मानसी जाधव आली.  दरम्यान मानसी जाधव ही बदलापूरला राहते. ती एका सामाजिक संस्थेत काम करीत होते. तिला या धंद्यात जास्त पैसे मिळतील या लालसे पोटी तिने हे काम सुरु केले. मानसी जाधव या कुटुंबीयाला मुलाच्या बदल्यात ९० हजार रुपये देणार होती. ती हे मुलं  २ लाख रुपयांना विकणार होती. मानसी हिने आत्तार्पयत किती गरीब मुलांना विकले आहे याचा तपास पोलिस करीत आहेत.या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून आर्थिक विवेचनेतून कुठल्या थराला मनुष्य पोचतो हे कोरोना काळातच पाहायला मिळत आहे

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web