दौंड/प्रतिनिधी – दौंड तालुक्यातील मिरवडी येथील मेंढपाळ संपत सोमा थोरात आणि दादा सोमा थोरात या दोन्ही भावांचा शेळ्या-मेंढ्यांचा कळप देवकरवाडी येथील मगरवाडी परिसरात मुक्कामी होता. रात्रीच्या अंधारात कळपावर अंदाजे दोन ते तीन बिबट्यानी हल्ला करून यातील ७ शेळ्या ठार करून शेजारील उसाच्या शेतात फरकटत नेल्या तर दोन शेळ्या व एक मेंढी कळपातच ठार केली. या बिबट्याच्या हल्ल्यात सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती समजताच वनक्षेत्रपाल जि.एम.पवार शिवकुमार बोंबले तसेच नाना चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला मिरवडी गावचे सरपंच सागर शेलार व माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी भेट दिली.वन खात्याने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी सरपंच यांनी केली.