दौंड/प्रतिनिधी – दौंड पोलिसांनी एक महिन्यापूर्वी कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 47 गावरान जातीच्या गाई ताब्यात घेऊन संगोपनासाठी बोरमलनाथ गोशाळेत सोडण्यात आल्या होत्या .त्यातील एका गावरान जातीच्या गाईच्या डोळ्याला झालेल्या कॅन्सर रोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात केडगाव येथील पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पठाण व त्यांचे मित्र डॉक्टर राहुल लकडे यांना एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर यश आले आहे. या यशस्वी शस्रक्रियेमुळे गोशाळेतील एका गावरान जातीच्या गाईला डॉक्टरांनी जीवदान दिल्याने गोशाळेचे संचालक आबा शेलार यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे.काही दिवसांपासून गाईच्या डोळ्यातून पाणी आणि रक्त मिस्त्रीत पू येऊन असंख्य वेदना होत असल्याने गाईचे खाण्याकडे लक्ष नव्हते.आबा शेलार यांच्या लक्षात हि गोष्ट आली यांनी त्वरीत डॉक्टरांना बोलावून गाईची तपासणी केली असता डोळा संपूर्ण खराब होऊन ताबडतोब ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला वेळ न घालवता दि.१० मे रोजी गाईच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्याचा निर्णय शेलार यांनी घेतला आणि एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर गाईच्या डोळ्याचे ऑपरेशन यशस्वी झाले परंतु गाईचा डोळा डॉक्टर वाचवू शकले नाहीत कारण तो पूर्ण कॅन्सरने खराब झाला होता खराब झालेल्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली नसती तर गाईच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.
बोरमलनाथ गोशाळा आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पठाण व त्यांचे सहकारी लकडे यांनी गाईला कॅन्सरच्या आजारातून मुक्त करून एकप्रकारे गाईला जीवदानच दिले.अशा अनेक प्रकारच्या गाई,बैल,भाकड गाईचे सेवा व संगोपन ह्या बोरमलनाथ गोशाळेत केले जाते. सध्या गोशाळेत २१० जनावरे असून रोज दोन टन चाऱ्याची व्यवस्था करावी लागते सध्या लॉकडाऊन असल्याने गोशाळेतील जनावरांना चारा मिळणे कठिण झाले आहे तरी दानशूर व्यक्तींनी चाऱ्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन गोशाळा संचालक आबा शेलार यांनी केले आहे.