सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर शहर व जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले असताना रमजान ईद आणि अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर ११ व १२ तारखेला सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत साहित्य खरेदी करण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे.कोरोनाचे नियम पाळत खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली असताना सोलापूर मधील ए पी एम सी मार्केटमध्ये सोशल डिस्टनिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले.
खरेदीसाठी नागरिकांनी मार्केटमध्ये पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.सोलापुरात आज आणि उद्या रमजान ईद आणि अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे.त्यामुळे सकाळी ७ ते ११ दरम्यान नागरिकांना किराणा माल व भाजीपाला खरेदी करण्यास मुभा देण्यात आली आहे.सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनाकडून कोरोनाच्या बाबतीतील नियम पाळून खरेदी करण्यात यावी असे सांगण्यात आले होते. असे असताना ए पी एम सी मार्केट मध्ये भाजीपाला खरेदी करीत असताना काही नागरिकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते तर काही जण मोकार फिरत होते.
सोलापुर शहर व जिल्ह्यात ८ मे ते १५ मे पर्यंत आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.लोकडाऊनमधून शिथिलता दिली असताना नागरिकांनी कोरोना बाबतचे नियम पाळून खरेदी करणे आवश्यक होते.