रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या त्रिकुटला पुणे ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दौंड-प्रतिनिधी– करोनाचा भीषण हाहाकार पसरला असताना मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचं समोर आले आहे.दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी येथे पुन्हा एकदा रेमडेसिवीरचा काळाबाजार उघड झाला आहे. मुंबई येथून रेमडेसिवीर इंजेक्शन आणून कुरकुंभ एमआयडीसी येथे काळ्या बाजाराने विक्री करणारे तिघेजण ताब्यात घेऊन एलसीबीच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे.
मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पुणे जिल्हयात कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमडेसिवीर इंजेक्शनची काळया बाजाराने शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असल्याची माहिती काढून कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिलेले होते . त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची प्रत्येक विभागात पथके नेमण्यात आलेली होती .त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दौंड पोलीस स्टेशनचे हद्दीत कुंरकुंभ एमआयडीसी , रिलायन्स कंपनीचे समोर ता.दौंड जि.पुणे येथे अॅक्टेंमरा व रेमडेसिवीर इंजेक्शनची काळया बाजाराने विक्री करणारे तिघे आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून १ अॅक्टेंमरा व ६ रेमडेसिवीर असे एकूण ७ इंजेक्शन व इतर मुद्देमाल असा एकूण किंमत रुपये ३,६२,१७५ / – चा माल जप्त केला आहे. अॅक्टेंमरा व रेमडेसिवीर इंजेक्शनची काळया बाजाराने विक्री करणाऱ्या १ ) दत्तात्रय मारुती लोंढे वय ३५ वर्षे रा.संम्मती अपार्टमेंट , प्लॅट नं .२०७ , दौंड ता.दौंड जि.पुणे . मूळ रा.नवीन गार ता.दौंड जि.पुणे २ ) अदित्य अनिरुध्द वाघ वय २५ वर्षे रा.साईनाथनगर , पोफळे स्टेडीयमजवळ , निगडी , पुणे . मूळ रा.आणेवाडी ता.जि. सातारा ३ ) अमोल नरसिंग मुंडे वय रा .२५ वर्षे रा.कळवा नाका , सिध्दीविनायक सोसायटी , रुम नं .२०३ , नवी मुंबई यांना अटक केली आहे . हे तिघे अॅक्टेंमरा इंजेक्शन १,५०,०००/ रुपयाला व रेमिडीसिव्हर इंजेक्शन प्रत्येकी २५,०००/- रुपयाला एक असे विक्री करीत असताना मिळून आले .

त्यांच्या जवळून १ अॅक्टेंमरा इंजेक्शन व ६ रेमिडीसिव्हर इंजेक्शन कि.रु.६०,६७५ / रोख रक्कम ५१,५०० / – रुपये , तीन मोबाईल कि.रु. ३०,००० / होंडा अॅक्टीव्हा दुचाकी किं.रु. ७०,००० व सॅट्रो कार किं.रु .१,५०,००० असे एकूण ३,६२,१७५ / -रु.चा माल जप्त करण्यात आला आहे . कोविड -१९ या साथीच्या आजारात रेमिडीसिव्हर इंजेक्शन बेकायदेशीररित्या ,अवैध व गैर मार्गाने मिळवून ते काळया बाजाराने स्वत : चे अर्थिक फायदयासाठी कोणताही परवाना नसताना विक्री करणेसाठी जवळ बाळगून औषध विक्रेते नसतानाही खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादकाने ठरविलेल्या एम . आर.पी. किंमती पेक्षा जास्त चढया बाजाराने विक्री करताना मिळून आले आहेत.
तिघे आरोपींवर दौंड पोलीस स्टेशनला भादंवि कलम १८८ , औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ सह वाचन कलम ३ ( २ ) ( सी ) , जिवनाश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ७ ( १ ) ( ए ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख , पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री .विवेक पाटील,बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट , सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे , सफौ . शब्बीर पठाण , पोहवा.महेश गायकवाड , निलेश कदम , सचिन गायकवाड , सुभाष राऊत , गुरु गायकवाड , पोहवा.मुकेश कदम , प्रमोद नवले , पोकॉ . अक्षय नवले , बाळासो खडके , प्रसन्न घाडगे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web