उंबर्डे येथील रस्ता रुंदीकरणातील ७० बांधकामावर केडीएमसीचा हातोडा

कल्याण : कल्याण पश्चिमेतील कै. आत्माराम भोईर चौक (तलाठीऑफिस) ते नेटक-या चौक,  उंबर्डे पर्यत २४ मी, १८ मी व १५ मी रूंद अशा रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी सुमारे ७० बांधकामे निष्कासनाची धडक  कारवाई  शनिवारी करण्यात आली.

हि कारवाई महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, ब प्रभागक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप, क प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडदे,  अ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत, उप अभियंता भालचंद्र नेमाडे व कनिष्ठ अभियंता अनिल वांगसकर, प्रकाश मोरे यांनी संयुक्तपणे तसेच अ,ब क प्रभागातील ३० कर्मचारी,  महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे १२ पोलीस कर्मचारी व खडकपाडा पोलीस स्टेशनचे २ पोलीस अधिकारी व २० पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि ३ जेसीबी व डंपर यांचा वापर करून करण्यात आली.  या रस्त्यामधील ११ घरे, ४ धाबे,  ४५ दुकाने, ५ कंपाऊंड वॉल, ४ भंगार दुकाने, १ सर्विस सेंटर अशी सुमारे ७० बांधकामे कारवाईत निष्कासीत करण्यात आली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web