सोलापूर /प्रतिनिधी – सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने त्याचे पडसाद सोलापुरात उमटताना पहायला मिळत आहेत.सोलापूर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आंदोलक निषेध करण्यासाठी जमत असताना,
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. दोन पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकत्यानी जोरदार घोषणाबाजी केली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरविल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे सध्या सोलापूर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकाला पोलीस छावणीच स्वरूप आलं आहे.