कल्याण /प्रतिनिधी- महाराष्ट दिनाचे औचित्य साधून वेदांत आर्ट अकॅडमीच्या वतीने ऑनलाइन चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन केले होते.कोरोना संकट असल्याने सर्वत्र लॉक डाऊन सुरू असल्या कारणाने विद्यार्थ्यांचा सुट्टीचा काळ आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी घरात बसून कंटाळले आहेत. त्यांना आपली कलाकृती बाहेर सादर करता येत नाही. आपल्या कलाकृती बरोबर अजूनही इतर कलाकारांची चित्र कृती सोबत मांडल्याने त्यांना अजून नवीन नवीन शिकायला मिळते म्हणून म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रत्यक्ष विद्यार्थी चित्रप्रदर्शन ठेवू शकत नाही म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने ऑनलाईन चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन केले होते. मौलिक, लतिका शेट्टी, पल्लवी कोव्हाड, मृणाल कोल्हे, निर्मय, हर्षिता गावात, ऋतुजा कथ्थापुरकर, जोयदीप नंदी, स्मिती मुखर्जी श्रद्धा, संस्कृती, यश महाजन आदी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
कुठलाही चित्रकार कलाकार हा स्तुतीने मोठा होतो. स्तूती केल्याने त्याला अजून उत्साह येतो म्हणून अशा संकटकाळात ऑनलाइन पद्धतीने चित्र प्रदर्शन आयोजित केले. या प्रदर्शनात एकूण १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या परिस्थितीत त्यांच्याकडे जे साहित्य उपलब्ध होते. त्या साहित्याचा वापर करून त्यांनी आपली कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांचे पालक व भावना महाजन कला शिक्षिका यांचेही सहकार्य लाभले हे चित्र प्रदर्शन यु ट्यूब. फेसबुक टेलिग्राम इत्यादी माध्यमातून प्रसारित करण्यात आले असल्याची माहिती कलाशिक्षक यश महाजन यांनी दिली