सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर शहर पोलीस शिपाई शांतीसागर जेनुरे यांनी आपल्या आईचा श्रीमती संगीता सुभाष जेनुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत फुटपाथवरील बेघर लेकरांनाच्या अनवाणी पायांना चप्पल देऊन त्यांच्या पायांना उन्हाच्या चटक्या पासून आधार देत आपल्या माय माऊलीचा जन्मदिन आनोख्या पद्धतीने साजरा केला.
रेल्वे स्टेशन जवळील बेघर लोकांच्या पायांना चप्पल देऊन उन्हाच्या चटक्यापासून सुटका करत एक सामाजिक बांधीलकी जोपासली.हे कार्य संभव फाऊंडेशन च्या माध्यमातून करण्यात आले.फाऊंडेशनच्या माध्यमातून शहरातील उपेक्षित हातावर पोट असणाऱ्या झोपड्या आणि फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना जेवण वाटप करण्यात येत असून यात रस्त्यावर राहणाऱ्या बेघर निराधार वंचित लोक,वयोवृध्द आजी-आजोबा,भिक्षेकरी,स्थलांतरीत कामगार यांना संभव फाऊंडेशनच्या माध्यमातून रोज जेवणाची सोय करण्यात येत आहे
यावेळी आस्मिता गायकवाड,आरती लांडे,वृषाली गायकवाड,प्रा.गणेश पवार,विश्वजीत बनसोडे,आतिश कविता लक्ष्मण आदी उपस्थित होते.
शहरात डियुटी वर असताना या चिमुकल्या लेकरांचे अनवाणी पाय बघून अस्वस्थता वाटतं होती.आईंच्या जन्मदिनाचे औचित्य साधत एक कर्तव्य म्हणून या चिमुकल्या लेकरांच्या पायांना उन्हापासून बचाव करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला आहे.आपणही संभव फाऊंडेशनच्या कार्याला हातभार लावून हे कर्तव्य पार पाडावे.