प्रियसी सोबत येत नाही म्हणून प्रियकराने केले प्रियसीच्या मुलीचे अपहरण,आरोपी गजाआड

कल्याण /प्रतिनिधी– प्रियसी सोबत येत नाही या रागातून प्रियकराने प्रियसीच्या तीन वर्षीय मुलीचे अपहरण केले. डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अवघ्या आठ  तासाच्या आत बेडय़ा ठोकल्या आहेत.त्यामुळे चिमुकल्या च्या आईवडिलांचे जीव भांड्यात पडला आहे . 

डोंबिवली पूर्व भागात राहणा:या एका महिलेचे दिनेश तिवारी नावाच्या व्यक्तिसोबत मैत्री होती. काही दिवस ही महिला दिनेश सोबत राहिली.  मात्र दोघांमध्ये वाद सुरु झाल्याने ती महिला पुन्हा पहिल्या पतीकडे आली. महिलेला दोन मुली आहेत. एक ६ वर्षाची तर दुसरी तीन वर्षाची. दिनेश तिवारी या महिलेकडे आला. त्याने हट्ट धरला की, तीने त्याच्या पुन्हा यावे. मात्र महिलेने दिेनेश सोबत जाण्यास नकार दिला. या रागातून दिनेशने तिच्या तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण केले. महिलेला माहित नव्हते की, मुलीचे अपहरण कोणी केले आहे. पोलिसांकडे या घटनेविषयी कोणताही सुगावा नसताना केवळ महिलेने सांगितले की, तिचा एका मित्रसोबत वाद झाला होता. या एकाच धाग्याच्या आधारे मानपाडा पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. अवघ्या सहा तासाच पोलिस पथकाने आरोपीला बेडय़ा ठोकल्या आहे. ३  वर्षाची चिमकलीस तिच्या आईच्या स्वाधीन केले आहे.दरम्यान कोरोना महामारीत मानपाडा पोलिसांनी उत्तम कामगिरी करून मोठया शिताफीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web