केडीएमसीच्या आरोग्य सेवेच्या विविध पदांसाठी इच्छुकांची गर्दी

कल्याण/ प्रतिनिधी – कल्याण डोंबिवलीमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा वाढवली जात असून या यंत्रणेत काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध १२० पदांसाठी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात भरती प्रक्रियेसाठी थेट मुलाखती घेण्यात आल्या.

कोवीड -१९ प्रार्दुभाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली मनपाने रुग्णालयीन सेवेसाठी वाढीव मनुष्यबळ उपलब्ध होण्याचा दुष्टीने वैघकीय आधिकारी, ७५००० रु.मासिक मानधन, आयुष वैघकीय आधिकारी ५०००० रू मासिक मानधन कंत्राटी तत्वावर पदाच्या ३४ जागा,  सिस्टर इनचार्ज ४०,००० रू मानधन मासिक १ पद,  ईसीजी टेकि्नशियन ८ पदे २२५०० रू.मासिक मानधन, स्टाँफ नर्स ५९ पदे ३०००० रू मानधन,  सहा. पारिचारिका प्रसविका १६पदे  २५०००रू मासिक मानधन, लँबँ टेकि्नशियन २ पदे २२५००रू.मासिक मानधन अशी एकंदरीत १२०  आरोग्य सेवक कर्मचारी भरती प्रक्रिया शुक्रवारी थेट मुलाखती माध्यमातून घेण्यात आली. या भरती प्रक्रिया साठी उमेदवाराचा उत्तम प्रतिसाद लाभला.

कोरोना काळात देखील भरती प्रक्रिया साठी राज्यातुन विविध ठिकाणहुन आलेले स्त्री, पुरूष उमेदवाराची गर्दी पाहता बेरोजगारी किती आहे. याचे भय्याण सत्य प्रत्यक्ष दिसले. महानगरपालिकेने सोशल डिस्टन नियमांचे पालन करीत भरती प्रक्रिया सुरू केली.

दरम्यान भरती प्रक्रीयेसाठी आलेल्या उमेदवारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेकांकडे पूर्ण कागदपत्रे नसल्याने परत जावे लागले. तर लॉकडाऊनमुळे झेरॉक्सची दुकाने बंद असल्याने या उमेदवारांची मोठी पंचायत झाली.    

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web