कामगारांच्या समस्या निवारणासाठी नोडल अधिकारी नियुक्त

मुंबई/ प्रतिनिधी – कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व इतर राज्यातील कामगारांकडून प्राप्त होणाऱ्या विविध तक्रारींसंबंधात कार्यवाही व्हावी, याकरिता मुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालय व मुंबई शहर कार्यालयाकरिता नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

नोडल अधिकारी यांनी राज्यातील व इतर राज्यातील स्थलांतरीत कामगारांकडून होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व संबंधितांशी समन्वय साधून कार्यवाही करावयाची आहे.

नोडल अधिकारी यांची माहिती : सतिश तोटावार, सहाय्यक कामगार आयुक्त, भ्रमणध्वनी क्र. 9960613756, ई-मेल adclkokandivision@gmail.com. मंगेश झोले, सरकारी कामगार अधिकारी, भ्रमणध्वनी क्र. 8451846222,  प्रविण जाधव, सहायक कामगार आयुक्त, भ्रमणध्वनी क्र. 8329695218,  ई-मेल dyclmumbaicity@gmail.com कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई (मुंबई मुख्यालय) मुंबई शहर कार्यालय, मुंबई

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web