कल्याण/प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोरोना रुग्णालयात कधी आग लागणे तर कधी ऑक्सिजनची गळती या सारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. डोंबिवली मधील कल्याण शीळ रोड येथील एस एस टी वैद्यरत्न या कोव्हीड रुग्णालयात रुग्णासह तिघांना घेऊन जाणारी लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडलीय आहे.
लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने लिफ्ट पहिल्या माळ्यावरून खाली कोसळली. या दुर्घटनेत चौघे जण जखमी झाले आहेत. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला व मोठा अनर्थ टळला. तर रुग्णालय प्रशासनाने मात्र लिफ्ट मध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
डोंबिवली मधील कल्याण शीळ रोड येथील एस एस टी वैद्यरत्न हे कोव्हीड रुग्णालय आहे. शुक्रवारी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आशा महाजन (४३), दिलीप महाजन (५६) हे दाम्पत्य आपल्या मुलाला उपचारासाठी या रुग्णालयात घेऊन आले. आशा नारकर या रुग्णालयीन महिला कर्मचाऱ्यासह तिघे जण लिफ्ट मधून पहिल्या माळ्यावर जात होते. पहिल्या मजल्यावर लिफ्ट अडकली यावेळी लिफ्ट मधील चौघे जण घाबरले. लिफ्टचा दरवाजा उघडत असताना अचानक लिफ्ट तळ मजल्यावर कोसळली.
या दुर्घटनेत लिफ्ट मध्ये असलेल्या तिघा जणांना गंभीर दुखापत झाली आहे. तिघांना उपचारासाठी डोंबिवली मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर रुग्णालय प्रशासनाकडून या लिफ्ट मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत देखभाल दुरुस्ती विभागाला कळवल असून या रुग्णांवर उपचाराचा संपूर्ण खर्च आम्ही करणार असल्याचं सांगितलं.