सोलापूर जिल्ह्यात २३ ठिकाणी पोलीस चेक पोस्ट, पास असेल तरच प्रवाशांना जिल्ह्यात प्रवेश

सोलापूर/प्रतिनिधी – वाढत्या कोरोनाला पायबंद घालण्यासाठी पर राज्यातून,जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची व प्रवाशी पासेसची तपासणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर 23 ठिकाणी पोलीस चेक पोस्ट तैनात करण्यात आल्या आहेत.यातील 5 चेक पोस्ट या सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहेत.यातील 18 चेक पोस्ट या जिल्ह्याच्या इतर सीमेवर आहेत.या सर्व चेक पोस्ट वरती वाहनांची कसून चौकशी करण्यात येत असून योग्य कारण असेल तर सोलापूर जिह्यात प्रवेश दिला जात आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
जिल्ह्यात आपल्या गावाकडे,शहराकडे येऊ इच्छिनाऱ्या प्रवाशांनी 48 तास आधी covid19.mhpolice.in या वेबसाईटवर पास साठी अर्ज करणे आवश्यक आहे.प्रवासाठी योग्य कारण असेल तरच 24 तासाच्या आत पास मिळेल. पास हा महत्वाच्या कारणासाठी दिला जाणार आहे.ज्या ठिकाणापासून प्रवाशी प्रवास करणार आहेत त्याची माहिती वेबसाईटवर भरून पुढील माहिती भरावी.प्रवासाच्या आयत्या वेळी 2 तास,4 तास आधी पाससाठी अर्ज करून प्रवास करणाऱ्या प्रवाशाना चेक पोस्टवरती अडवून जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही.अशा प्रवाशांना जिल्ह्याच्या सीमेवरून माघारी पाठवण्यात येईल.काही चुकीचे कारण देऊन पास काढण्यात आला आहे असे जर लक्षात आले तर 10,000 रुपये दंड आकारण्यात येईल.
लग्न समारंभाला दोन तासांचा अवधी देण्यात आला असून त्यासाठी 25 लोकांना परवानगी देण्यात आली आहे.लग्न समारंभात सोशल डिस्टनिग,मास्क,सॅनिटायझर, याचा वापर करून विवाह सोहळा संपन्न करण्यात यावा.जे कोणी या नियमांचा भंग करतील त्यांना 50,000 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.मंगल कार्यालय,हॉल येथे विवाह सोहळे पार पडले तर 10,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.तसेच मंगल कार्यालय,हॉल सील करण्यात येतील.
एसटी व खासगी वाहनांमधून 50 टक्के पेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करता येणार नाही.या वाहनातून सरकारी अधिकारी,डॉक्टर, मेडिकल स्टाफ,तसेच इतर प्रवाशी यांना प्रवास करता येणार आहे.एसटी,खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर पोलीस चेक पोस्ट वरती होम क्वारंटाईन शिक्का मारण्यात येणार आहे.त्यासाठी चेक पोस्टवरती प्रवाशांनी गोंधळ घालू नये.
ही बंधने कोणालाही त्रास देण्याच्या उद्देशाने नाहीत.कमीत कमी वाहतूक व्हावी.अनावश्यक वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी आहेत.देशावर,राज्यावर,पर्यायाने जिल्ह्यातील वाढत असलेल्या कोविड वर मात करता यावी यासाठी आहेत.त्यामुळे चांगल्या प्रकारे लॉकडाऊन पाळून शासन,प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी यांनी केले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web