अकोला/ प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारातुन अकोलकर जनतेसाठी सुसज्ज असे कोव्हीड सेन्टर उभारण्यात आले आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीहार यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शना खाली जिल्हा परिषदेच्यावतीने महाराष्ट्रातील पाहिले 50 खाटांचे सुसज्ज कोव्हीड सेन्टरचे उदघाटन बाळासाहेब आंबेडकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

अकोल्यात सध्या वाढती कोरोना रुग्ण संख्या, बेड व रेमडीसीविरसाठी होणारी रुग्णांची परवड भयावह स्थितीत गेली असताना , अकोलेकर नागरिकांसाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेतला व विक्रमी वेळेत सुसज्ज कोव्हीड सेन्टरचे लोकार्पण झाले. या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले , पोलीस उपविभागीय अधिकारी कदम साहेब डॉ धैर्यवर्धन पुंडकर प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी प्रदीप वानखडे जिल्हाध्यक्ष भारिप जिल्हा परिषदेचे गटनेते ज्ञानेश्वर सुल्ताने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा ताई भोजने उपाध्यक्षा सवित्रीताई राठोड सभापती आकाश शिरसाट सभापती पंजाबराव वडाळ जिल्हा परिषद सदस्य अविनाश खंडारे , राम गव्हाणकर , समिती सदस्य दिनकरराव खांडारे, डॉ उन्हाळे , पांडे गुरुजी ,मनोहर पंजवणी , रुग्ण कल्याण समिती सदस्य पराग गवई तसेच जिल्हा प्रशासनातील व जिल्हा परिषेदेचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .