उदघाटन समारंभ बाजूला ठेवून कोरोना रुग्णासाठी दिले स्वताचे हॉस्पिटल

सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याने सोलापूर शहरातील बऱ्याच हॉस्पिटलवर भार वाढला आहे.शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेडसाठी धावा-धाव करावी लागत आहे. तर काही रुग्णांना ऑक्सिजन बेड अभावी जीव गमवावा लागला आहे.असे असताना कोरोना रुग्णाचे प्राण वाचावे त्यांना नवजीवन मिळावे या हेतूने सोलापूर शहरातील ह्रदयरोग तज्ञ डॉ.अमजद बशीरअहमद सय्यद यांनी आपल्या सहा मजली हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ बाजूला ठेऊन कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी हॉस्पिटल देण्याचा निर्णय घेतला.त्याच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून सध्या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये 25 कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत.
सोलापूर शहरातील पदयशाली चौक येथे डॉ. अमजद सय्यद यांनी नोबल सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नावाचे सहा मजली हॉस्पिटल उभे केले आहे.हॉस्पिटलचे फर्निचरचे काम पूर्ण झाले असून त्याचे काही दिवसात उद्घाटन होणार होते.पण अचानक कोरोनाने डोके वर काढल्याने शहरात रुग्णांना बेड व ऑक्सिजनसह इतर सुविधांचा अभाव जाणवू लागला.त्यामुळे त्यांनी आपले हॉस्पिटल कोविड रुग्णाच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार त्यांनी महानगर पालिकेडे प्रस्ताव पाठविला.महानगर पालिकेने हॉस्पिटलची पाहणी करून लगेच प्रस्तावास मान्यता दिली.डॉ. अमजद सय्यद यांच्या या हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर ऑक्सिजनचे बेड तयार केले असून तेथे 25 कोरोना रुणांवर उपचार सुरू आहेत.या रुग्णालयाचा स्वतःचा स्टाफ असून तो कोरोना रुग्णाची काळजी घेत आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत आहेत.त्यामुळे रुग्णाची हेळसांड होत असून कोरोनामुळे अनेकांचे नाहक बळी जात आहेत.रुग्णाचे जीव वाचवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी शासन,प्रशासनाला सहकार्य करावे.माझ्या हॉस्पिटलचे उदघाटन आज नाही तर उदया होईल.अशा कोरोनाच्या कठीण प्रसंगी मी लोकांच्या कामाला आलो याचे समाधान असल्याचे डॉ. अमजद सय्यद यांनी सांगितले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web