कल्याण/ प्रतिनिधी – कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असताना कोवीड रुग्णांचे मृत्यूही वाढत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कोवीड रुग्णांवर मोफत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवलीत सध्या कोरोना रुग्णांबरोबरच त्यांचे मृत्यूही वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील गॅसच्या शव दाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. त्यामूळे 2 शवदाहिन्या बंद पडल्या असून त्यांच्या दुरुस्तिचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका शहर अभियंता सपना कोळी यांनी लाकूड व्यापारी आणि गॅस एजन्सीच्या मालकांची नुकतीच एक ऑनलाईन बैठक घेतली. त्यामध्ये गॅस शवदाहिन्यावर येणारा ताण पाहता कोरोना मृतदेहांवर लाकडावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच हे अंत्यसंस्कार संपूर्णपणे निःशुल्क केले जाणार असल्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे सपना कोळी यांनी सांगितले.