सोलापूर/ प्रतिनिधी – संभव फाऊंडेशन च्यावतीने सोलापूर शहरातील उपेक्षित हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.झोपड्या व फुटपाथवर राहणाऱ्या ४०० लोकांना दररोज दोन वेळचे मोफत जेवण वाटप करण्यात येत असून यात रस्त्यावर राहणाऱ्या बेवारस मनोरुग्ण,वयोवृध्द आजी-आजोबा,बेघर लोक,भिक्षेकरी,स्थलांतरीत कामगार यांना संभव फाऊंडेशनच्या वतीने जेवणाची सोय करण्यात आली आहे अशी माहिती संभव फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण यांनी दिली.
शहरातील अनेक लोकांचा रोजगार बंद असून उदर्रनिर्वाह होत नाही.अशा लोकांना जेवण पुरवण्याचं कार्य संभव फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या आठवड्यापासून सुरू आहे.रोजच्या जेवणामध्ये दाळ खिचडी,व्हेज पुलाव,मसाला राईस,चपाती भाजी दिली जाते.
संभव फाऊंडेशनची टिम लोकांना मास्क,सॅनिटराझर देऊन सुरक्षित अंतर विषय मार्गदर्शक सुचना करत आहे.फाऊंडेशनन मार्फत कोरोना विषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू आहे.
यासाठी संभव फाऊंडेशनचे स्वंयसेवक आस्मिता गायकवाड,आरती लांडे,रुपाली हुडेकरी,राणी सिरसट,वृषाली गायकवाड,शोभा शेंडगे,भाग्यश्री सोनवणे,रुपाली पाटिल,पवन व्हनकडे,प्रा.सचिन शिंदे,संतोष माने,चेतन लिगाडे,पंकज क्षीरसागर,आदी योगदान देत आहेत.