भिवंडीत यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली, तीन मजुरांचा मृत्यू तर तीन जण गंभीर

भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे . या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू तर तीन मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत . राजू उर्फ रणछोड प्रजापती ( वय ५० वर्ष ), भगवान मामा ( वय ५५ वर्ष ), मनसुख भाई ( वय ४५ वर्ष ) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांची नवे आहेत .         

भिवंडी तालुक्यात काटई ग्राम पंचायत हद्दीत देवानंद कंपाउंड येथे हा धोकादायक यंत्रमाग कारखाना होता . कारखान्याच्या भिंती जीर्ण झाल्याने हा यंत्रमाग कारखाना मागील चार दिवसांपासून बंद होता व कारखान्याच्या जीर्ण झालेल्या भिंतींच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. गवंडी कामगार व मजुरांच्यामार्फत हे काम सुरु होते . यावेळी भिंतीचे काम करण्यासाठी मजुरांनी परांची देखील बांधली होती. व त्यावर काम सुरु होते . मात्र हे काम सुरु असतांनाच लोखंडी अँगल व पत्राचा भार जीर्ण भिंतींवर पडल्याने भिंत कोसळली व त्यासोबतच छताचे लोखंडी अँगल व पत्रा देखील खाली कोसळला . या दुर्घटनेत तीन बांधकाम मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर तीन जण या दुर्घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत . या घटनेची नोंद निजामपूरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web