रस्त्यावर भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर, डॉ.अभिजीत सोनवणे

पुणे/ प्रतिनिधी– पुण्यातील डॉ.अभिजित सोनवणे यांनी अनेक वर्षे एका इंटरनॅशनल संस्थेमध्ये महाराष्ट्र प्रमुख म्हणुन काम केले असून त्यांना लाखो रुपये पगार होता.परंतु आयुष्याच्या सुरुवातीला अत्यंत कठीण काळ होता.अशा कठीण काळामध्ये इंटरनॅशनल संस्थेमधील 15 ऑगस्ट 2015 ला नोकरी सोडुन,रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिक्षेकर्यावर गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात डॉ अभिजित सोनवणे व त्यांची पत्नी उपचार करत आहेत .
याबद्दल अभिजित सोनवणे म्हणतात की,या कामात माझी पत्नी डॉक्टर मनीषा सोनवणे हिचा सहभाग खूप मोठा आहे.घरातला कर्ता पुरुष, हा पुरुषच असतो, याला छेद देत तीने, मी नोकरी सोडल्यावर आख्खं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी घेतलीय, मी तिच्या ऋणांत आहे.मोटरसायकलवर रोज दवाखाना घेऊन मी फिरत असतो, याचना करणारी मंडळी रस्त्यावर बसतात.तेथे मी त्यांच्यात बसतो-उठतो-खातो -पितो..खुप सुख आहे या आईबापांजवळ बसण्यात… !
इंटरनॅशनल संस्थेतल्या माझ्या हेड म्हणुन असलेल्या खुर्चीपेक्षा खुप उबदार आहे हा उकीरडा आणि गटारा शेजारचा रस्ता !याच रस्त्यांवर मी यांना वैद्यकीय सेवा देत असतो या सेवा देत असताना त्यांच्याशी आपुलकीचं मायेचं – प्रेमाचं नातं निर्माण करतो आणि या नात्याच्या बळावर त्यांना विनंती करतो, कि आईबाबा, आपण हे भीक मागणं सोडा आणि सन्मानाने स्वतःच्या पायावर उभा रहा.
अभिजित सोनवणे यांना त्यांच्या कामाने 300 आईबाप व 800 आजी-आजोबा दिले आहेत.याशिवाय सोनवणे भीक मागणाऱ्या 300 लहान मुलांना शाळा शिकवत आहेत.त्यांनी आजपर्यंत 84 कुटुंबांना भीकेच्या डोहातुन बाहेर काढले आहे.डॉ.अभिजित सोनवणे यांच्या कार्याला नेशन न्युज मराठीचा सलाम.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web