कल्याण /प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली कोरोना प्रादुर्भाव वाढला असून रोज हजार दोन हजार रुग्ण वाढत आहे. मात्र मृत्यू दर कमी असून बरे होण्याचे प्रमाण ही मोठे आहे . पण काही दिवसांपासून कोरोना रुग्णात वाढ झाल्याने पालिका रुग्णालयात जागे अभावी बसण्याच्या आसनावर उपचार केले जात आहे .त्यामुळे नागरिकांनी कोरोना महामारीला थट्टेवारी घेऊ नये. नियमांचे पालन करून स्वतःचा जीव तर वाचवाच पण आपल्या मुळे दुसऱ्याला कोरोना प्रादुर्भाव होणार नाही यांचीही काळजी घ्या. कोरोना रोखण्यात सर्वांनी एकजूट होऊन कोरोनाशी मुकाबला करा.
कल्याण डोंबिवली शहरा कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत असून यात रुग्णालय न मिळाल्याने अनेकांचे हाल होत आहे. कल्याणच्या रुखमणीबाई रुग्णालयामध्ये मध्ये बेड उपलब्ध नसल्याने रूग्णाना रूग्णालयाच्या आवारातच रूग्णांना बसण्याच्या आसनावर आॅक्सिजन लावण्यात आले आहे. हे खूप विदारक चित्र आहे. हे चित्र जर बदलायचे असेल तर आपण बदलले पाहिजे. सर्वांनी एकजूट होऊन कोविड योद्धाना साथ दिली पाहिजे. नियानाचे तंतोतंत पालन करायला हवे.दरम्यान या बाबत पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना विचारले असता त्यांनी असे सागितले कि आम्ही प्रयत्न करतोय कोणत्याही रुग्णाचा उपचारा आभावी मृत्यू होऊ नये म्हणून रुग्णांना मिळेल त्या जागी रुग्णालयात उपचार करीत आहोंत. त्याच बरोबर प्रशासनाचा प्रयत्न राहील कोरोना रुग्ण कमी करण्याचा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीआहे .प्रशासन व कोविड योध्ये आप आपल्या परीने काम करीत आहे आपणही प्रशासनास सहकार्य करा. त्यामुळे आपणही नियम पाळूयात आणि कोरोनाला हरवूयात