ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध,बघा काय चालू व काय बंद

मुंबई प्रतिनिधी- राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दि १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून दि १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना दिलासाही देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले आहेत. जीवनावश्यक बाबींवर कुठलेही निर्बंध न ठेवता इतर महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

त्याअंतर्गत काय सुरू राहील व काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती जारी करण्यात आलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे. ती खालीलप्रमाणे….

अशी आहे ‘ब्रेक द चेन’ची नवी नियमावली:-

१.  कलम १४४ आणि रात्रीची संचारबंदी

ए. राज्यभर कलम १४४ लागू होणार

बी. खाली दिलेल्या कारणांव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही

सी. सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणं, उपक्रम, सेवा बंद राहतील

डी. जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार हे यातून वगळण्यात आले आहेत.

ई. अपवादश्रेणीत असलेल्या सेवा आणि व्यवहार सकाळी सात ते रात्री ८ या वेळेत कार्यालयीन दिवसांसाठी वगळण्यात आल्या आहेत.

एफ. मोलकरणी, घरगुती कामगार, वाहन चालक, वैयक्तिक निगारक्षक यांची सेवा अपवादश्रेणीत घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी स्थानिक स्थितीनुसार निर्णय घ्यायचे आहेत.

२.  जीवनावश्यक श्रेणीत या बाबींचा समावेश आहे

१.  रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लशीकरण, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात उत्पादन आणि वितरणसंबंधी आस्थापना असतील म्हणजे वितरक, वाहतूकदार, पुरवठा साखळीतले लोक. नशींचे उत्पादन आणि वितरण, सँनेटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे, इतर पूरक उत्पादने आणि सेवा.

२.  पाळीव प्राण्यांसाठीची खाद्यादुकाने, प्राण्यांसंबंधी सेवा, प्राण्यांचे निवारागृह आदी.

३.  किराणा सामानाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूधडेअरीज, बेकऱ्या, सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने

४.  शीतगृहे आणि वखारसेवाविषयक आस्थापना

५.  सार्वजनिक वाहतूक – हवाई सेवा, रेल्वेसेवा, टँक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसगाड्या.

६.  विविध राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन आणि अनुषंगिक सेवा

७.  स्थानिक प्रशासनांच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती कामे

८.  स्थानिक प्रशासनाची सर्व सार्वजनिक कामे

९.  ऱिझर्व्ह बँक आणि तिनं आवश्क ठरवलेली सर्व कामे

१०. सेबीनं मान्यताप्राप्त ठरवलेली सर्व कामं ज्यात स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिरी, क्लिअरिंग संबंधीची कामं अशी कामे

११. दूरसंचार सेवांशी संबंधित सेवा, देखभाल दुरुस्ती

१२.  मालवाहतूक

१३. पाणीपुरवठा विषयक सर्व कामे, सेवा

१४.  शेतीशी संबंधित सर्व कामे आणि शेती निरंतरपणे होऊ शकेल यासाठीची सर्व कामे. य़ात बीबियाणे, खते, उपकरणे आणि दुरुस्ती हे सर्व समाविष्ट आहे.

१५.  आयात निर्यात विषयक सर्व व्यवहार

१६.  जीवनावश्यक वस्तूविषयक ई-कॉमर्स

१७.  अधिस्वीकृतीप्राप्त माध्यमकर्मी

१८. पेट्रोल पंप आणि पेट्रोलसंबंधी उत्पादने, सुदूर समुद्रात वा किनारपट्टीवरील उत्पादने

१९.  सर्व प्रकारच्या कार्गो सेवा

२०.  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या क्लाऊडसेवा, डेटा सेंटर्स आणि पायाभूत सुविधांसाठीच्या महत्त्वाच्या माहिती-तंत्रज्ञानविषयक सेवा

२१.  सरकारी आणि खासगी सुरक्षारक्षक सेवा

२२. विद्युत तसेच गँसपुरवठा सेवा

२३.  एटीएम आणि तत्संबंधीच्या सेवा

२४. टपालसेवा

२५. बंदरे आणि ततस्बंधीच्या सेवा

२६.  लस तसेच इतर जीवरक्षक औषधे आणि औषधी उत्पादकांचे कस्टम हाऊस एजंट तसेच परवानाधारक मल्टिमोडल वाहतूकदार

२७.  कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे कच्चे माल किंवा वेष्टनसामुग्री बनवणारे कारखाने

२८. आगामी पावसाळ्यासाठी वैयक्तिक वा संस्थात्मक उत्पादनांमधे कार्यरत कारखाने

२९. स्थानिक आपत्तीनिवारण प्राधिकरणाने जीवनावश्यक ठरवलेली कोणतीही सेवा

वर उल्लेखलेल्या सेवांसंदर्भात अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी खालीलल सर्वसाधारण तत्वांची अंमलबजावणी करावी

१.  सर्व अधिकारी कार्यालयांनी हे सर्व निर्बंध नागरिकांच्या वावरावर असून वस्तू आणि मालावर हीत, हे लक्षात घ्यावे.

२.  यात नमूद केलेल्या सेवांच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक वाहतूक हे वैध कारण राहील, हे लक्षात घ्यावे.

३.  या सेवांची विशिष्ट वेळी वा कारणाने गरज भासली तर संबंधित व्यक्ती वा संस्थेसाठी ती सेवा जीवनावश्यक गणली जावी. त्यासाठी मूळ तत्त्व हे जीवनावश्कतेसाठी आवश्यक ते आवश्यक हे असावे.

या आदेशात जीवनावश्यक सेवांखालची दुकाने म्हमून गणली गेलेली दुकाने खालील मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे असतील

ए. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाने कार्यरत राहताना कोविडसुसंगत वागणूक ठेवणे आवश्यक आहे म्हणजे दुकानमालकाने तसेच कर्मचाऱ्यांनी आणि ग्राहकांनीही दुकानाच्या परिसरात तसे वागायला हवे.

बी. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानमालकाने तसेच कर्मचाऱ्यंनी लवकरात लवकर लशीकरण करून घेणे आवश्यक आहे. तसेच ग्राहकाशी पारदर्शक काचेच्या मधून किंवा इतर संरक्षक पदार्थांच्या द्वारे संपर्क करणे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे वळते करणे अशी सुरक्षाविषयक काळजी घ्यायला हवी.

सी. या नियमांचा भंग करणाऱ्या दुकानमालक, कर्मचारी किंवा ग्राहकाला पाचशे रुपये दंड केला जाईल. तसेच कोविडसंसुसंगत वागणूकीचा भंग करणाऱ्या ग्राहकाला माल दिला जात असेल तर दुकानाला एक हजार रुपये दंड केला जाईल. तसेच कोविडविषयक संकटाची अधिसूचना संपेपर्यंत दुकान बंद करण्याची कारवाईही केली जाऊ शकेल.

डी. १बी च्या कार्यवाहीसाठी जीवनावश्यक वस्तू दुकानातले व्यवहार करण्यासाठी कर्तव्यपूर्तीसाठी कामगारांची वाहतूक हे वैध कारण धरले जाईल.

ई. २(३) मधे नमूद केलेल्या वाण्याचे दुकान, भाजीपाला दुकान, फळविक्रेते, दूधदुकाने, बेकऱ्या, खाद्यपदार्थ दुकाने या सर्वांच्या संदर्भात दाट लोकवस्तीच्या ठिकाणी दुकाने आहेत का किंवा दुकानांमधे गर्दी होते आहे का, याबद्दल स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी अभ्यास करून दुकानांच्या वेळा बदलणे तसेच दुकानांच्या वेळा निर्धारित करून देणे आवश्यक आहे. खुल्या मैदानांच्या जागा मोकळ्या जागा निर्धारित करून काही दुकाने हलवणे शक्य आहे का, तात्पुरत्या स्वरूपाची दुकानं सुरू करता येतील का, हे बघणेही आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने सर्व प्रकारचे उपाय योजणे गरजेचे आहे ज्याद्वारे हे जीवनावश्यक व्यवहार कोविड पसरण्याला निमंत्रण देणारे ठरणार नाहीत. स्थानिक प्रशासन काही व्यवहार बंदही करू शकेल.

एफ. सध्या बंद असलेल्या सर्व दुकानांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या सर्व कामगारांचे लशीकरण करून घयावे तसेच ग्राहकांशी संपर्क काचेच्या संरक्षक कवचाच्या माध्यमातून यावा, ही पूर्वकाळजी घेण्याची सुविधा निर्माण करावी आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीचाही अवलंब करावा ज्याद्वारे त्यांची दुकाने कोणत्याही प्रकारे कोविड संसर्ग न पसरवता कार्यान्वित केली जाऊ शकतील.

४.  सर्वजनिक वाहतूक – सार्वजनिक वाहतूक खालील निर्बंधांसह सुरू राहील

अटोरिक्षा         चालक अधिक २ प्रवासी

टँक्सी (चारचाकी)  चालक अधिक पन्नास टक्के वाहन क्षमता

बस             पूर्ण प्रवासीक्षमता, उभे प्रवासी बंदी

ए. सर्व प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे. मास्क नसल्यास पाचशे रुपये दड केला जाईल

बी. चारचाकी टँक्सीमधे एखाद्या प्रवाश्याने मास्क न घातल्यास तो प्रवासी आणि चालकालाही पाचशे रुपे दंड केला जाईल

सी. प्रत्येक खेपेनंतर वाहने सँनेटाईझ करणे आवश्यक आहे

डी. भारत सरकारच्या नियमानुसार सर्व प्रवासी वाहनांचे चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी लशीकरण करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी कोविड सुसंगत वागणुकीचे दर्शन घडवणेही गरजेचे आहे. टँक्सी आणि अटोरिक्षांसाठी चालकाने स्वतःच्या आणि प्रवास्यांच्यामधे प्लास्टिकचे आवरण घालून संरक्षक कवच निर्माण करायला हवे.

ई. १बीनुसार सार्वजनिक वाहतुकीसाठी जाणाऱ्या कर्मचार्यांचा प्रवास हे वैध कारण असेल.

एफ. बाहेरगावच्या ट्रेन्ससाठी रेल्वेप्रशासनाने उभे राहून कोणीही प्रवासी प्रवास करणार नाहीत, याची खातरजमा करावी. तसेच सर्व प्रवासी मास्क लावतील, हेही बघावे.

जी. कोविडसुसंगत वागणूक न केल्यास पाचशे रुपयांचा दंड सर्व ट्रेन्समधेही लावावा.

एच. सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देतानाच ती सुरळीतपणे व्हावी, यासाठी लागणाऱ्या नैमित्तिक सेवाही त्यात समाविष् करूनच ही परवानगी देण्यात आलीय. त्यात हवाईसेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या कार्गोसारख्या सेवा तसेच तिकीटविषयक सेवांचाही समावेश आहे.

आय. सार्वजनिक वाहतुकीने म्हणजे बस, ट्रेन किंवा विमानाने आलेल्या प्रवाशाला येताना किंवा जाताना घरी जाण्यासाठी वा घरून येण्यासाठी करावा लागणारा प्रवास वैध प्रवासतिकीट दाखवून करता येईल.

——

5 अपवादात्मक श्रेणी

अ कार्यालय

खालील कार्यालय हे अपवादात्मक श्रेणीमध्ये असेलकेंद्रीय, राज्य तथा स्थानिक शासकीय कार्यालय, त्यांचे प्राधिकरण आणि संघटन सहकारी, सार्वजनिक युनिट आणि खाजगी बँकआवश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे कार्यालयविमा मेडिक्लेम कंपन्याउत्पादन /वितरण व्यवस्थेमध्ये असणारे औषधी कंपन्यांचे कार्यालयसर्व गैर-बँकिंग वित्तीय महामंडळसर्व सूक्ष्म वित्तीय संस्थाजर प्राधिकरण आयोगांच्या सुनावणी चालू असेल तर त्या वकिलांचे कार्यालय.या सर्वांनी कमीत कमी कर्मचाऱ्यांसोबत काम करावे आणि एका वेळेला कार्यालयात क्षमतेच्या 50टक्क्यापेक्षा जास्त कर्मचारी कोणत्याही स्थितीत हजर राहता कामा नये. फक्त कोविड-19 च्याकामासाठी असणारे शासकीय कार्यालय अपवाद असतील. सदर कार्यालयांमध्ये हजर राहण्यासाठी येण्या-जाण्यासाठी परवानगी गृहीत धरण्यात येईल.

आवश्यक असल्यास, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन याच्यामध्ये आणखीन काही अपवाद जोडू शकतात.

अभ्यागतांना कार्यालय मध्ये बोलवता कामा नये.कार्यालयाच्या कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त कोणाशीही बैठक घ्यायची असल्यास ऑनलाइन साधनांचा वापर करावा.

भारत सरकारच्या नियमानुसार सरकारी व खाजगी,अशा दोन्ही कार्यालयातील लोकांनी शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून हे कार्यालय चालू करता यावे.

ब खाजगी वाहतूकखाजगी बसेस सह सर्व खाजगी वाहने फक्त आपत्कालीन स्थितीत वाहतूक करू शकतात.एखाद्या रास्त कारणासाठी ही त्यांना वाहतूक करता येईल. विनाकारण वाहतूक केल्यास एक हजार रुपयाचा दंड आकारण्यात येईल.खाजगी बसांकरीता खालील अतिरिक्त नियम लागू असतीलकेवळ बसलेल्या प्रवाशांना घेऊन जाता येईल.कोणतेही उभे प्रवाशांची वाहतूक बंदी असेल.

सर्व कर्मचारी वर्गांना शासकीय नियमानुसार लासघ्यावी लागेल व कोविड-19 नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

क उपहारगृह, बार, हॉटेलसर्व उपहारगृहे आणि बार ग्राहकांना सेवा देऊ शकणार नाही. फक्त त्या परिसरात राहणारे व हॉटेलचा अविभाज्य घटक असणाऱ्यांसाठी ही सोय उपलब्ध असेल.ब फक्त होम डिलिव्हरी सेवा पुरवण्यास परवानगी असेल. कोणत्याही उपहारगृह किंवा बार ला भेट देऊन ऑर्डर देता येणार नाही.

क उपाहारगृह आणि बार मधील हॉटेल फक्त आतील पाहुण्यांसाठी चालू असेल. कोणत्याही स्थितीत बाहेरच्या पाहुण्यांना येण्याची परवानगी नसेल. अति आवश्यक असल्यास बाहेरून येणाऱ्यांना सर्व नियमांचे पालन करावे लागेल.हॉटेलमधील पाहुणे फक्त महत्त्वाच्या कारणांसाठी बाहेर जाऊ शकतील, आपली ड्युटी करणे किंवा अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे काम असेल तरच त्यांना जाता येईल.भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार होम डिलिव्हरी सेवेमध्ये असणाऱ्या सर्व जणांना लसीकरण करून घ्यावे लागेल.ज्या इमारतींमध्ये एकापेक्षा जास्त कुटुंब राहात असतील तिथं होम डिलिव्हरी करण्यासाठी सर्व निर्बंधाचे पालन करावे लागतील आणि त्या इमारतीचे कर्मचारी हे पार्सल आत मध्ये पोहोचू शकतील. होम डिलिव्हरी करणारे कर्मचारी आणि बिल्डिंग चे कर्मचारी यांच्यातील संवाद हा अनुशासित पद्धतीने कोविड नियमांचा पालन करूनव्हावा ही अपेक्षा.कोविडचे  नियम तोडल्यास अथवा त्याचे उल्लंघन केल्यास व्यक्तिश: एक हजार रुपये दंड आकारला जाईल, तसेच आस्थापनेच्या विरोधात दहा हजार रुपये दंड ठोठावलाजाईल. वारंवार अशाच प्रमाणे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कोविड-19 निर्बंध लागू असेपर्यंत परवाना रद्द करण्यात येईल.अश्या उपहारगृह आणि बारमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेण्याचा सल्ला दिला जात असून त्यांनी लवकरात लवकर भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करावे, ही अपेक्षा.ड उत्पादन क्षेत्र

खालील कारखाने चालू राहू शकतात आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कार्य करू शकतातआवश्यक सेवेसाठी लागणारा माल तयार करणारे कारखाने आपल्या पूर्ण क्षमतेअनुसार चालू राहतील.निर्यात करण्यासाठीचे सामान बनविणारे कारखाने ज्यांना माल बाहेर पाठवायचा आहे.ज्या कारखान्यांमध्ये एकदम काम थांबवता येणार नाही आणि जास्त वेळ लावल्याशिवाय उत्पादन पुन्हा सुरू होऊ शकणार नाही अशा सर्व कारखान्यांना 50 टक्के क्षमते सह काम करता येईल.महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने यावर नजर ठेवावी व सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहे याची खात्री करावी.कामगारांना राहण्याची व्यवस्था असणारे सर्व उद्योग किंवा युनिट मध्ये कामगार त्याच परिसरातील किंवा इतर ठिकाणच्या कारखान्यात काम करत असतील आणि तेथून वाहतूक सोयीस्कर आणि सुरक्षित असेल तर ये जा करता येईल. त्याचप्रमाणे व्यवस्थापन मधील दहा टक्के कर्मचारी अधिकाऱ्यांना बाहेरून येऊन काम करता येईल ज्या स्टाफ मधील कर्मचाऱ्यांना बाहेरजाण्याची गरज नाही आशय कारखाने वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करू शकतात.व्यवस्थापन, कर्मचारी, प्रशासना मधील स्टाफच्या सगळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे लागतील. जर हे कारखाने भारत सरकारच्या कार्यस्थळ लसीकरण अटीत बसत असतील,तर त्यांना लसीकरणाची व्यवस्था करावी लागेल.कारखाने आणि उत्पादन करणारे युनिट यांना खालील शिस्त पाळाव्या लागतील-सर्व येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शरीराचा तापमान तपासून नियमांचे पालन करावे लागेल.जर एखादा कर्मचारी कामगार पॉझिटिव्हआढळला तर त्याच्यासोबत काम करणारे सगळे कर्मचारी व कामगारांना विलगीकरणातघेऊन त्यांना पगार द्यावा लागेल.ज्या कारखाना किंवा कंपनीत 500 पेक्षा जास्त कामगार असतील, त्यांनी स्वतःचेक्वरीनटीन सुविधा उपलब्ध करावी. सदर केंद्रांमध्ये सर्व मूलभूत सुविधा असाव्यात आणि जर ही सुविधा कंपनीच्या परिसरात बाहेर असेल तर सर्व सुरक्षा उपाय करून पॉझिटिव्ह व्यक्तीला त्या केंद्रापर्यंत घेऊन जावं लागेल.जर एखादा कामगार पॉझिटिव्ह आढळला तर पूर्ण कारखाना सनीटाइज करेपर्यंत काम बंद ठेवावा लागेल.गर्दी टाळण्याच्या उद्देशाने भोजन आणि चहाच्या अवकाश यांना बगल द्यावंसार्वजनिक जेवणासाठी कोणतीही जागा ठेवू नयेसार्वजनिक शौचालय यांना वारंवार सैनी टाईज करावएखादा कामगार पॉझिटिव्ह आढळल्यास तो/ती ला वैद्यकीय रजा द्यावी आणि गैरहजर असल्याकारणाने नोकरीतून बात करता येणार नाही. अशा कर्मचाऱ्याला तेवडा पगार घेण्याचा अधिकार असेल, जो त्यांना कोरोनाझाला नसता तर मिळाला असता.या ठिकाणी नमूद नाही केलेले सगळे उद्योग/कारखाने यांनी आपला उद्योग सदर आदेशामध्ये उल्लेखित कालावधीपर्यंत बंद ठेवावा. काही शंका असल्यास उद्योग विभाग आणि प्रशासन या बद्दल अंतिम निर्णय घेईल.रस्त्यावरील खाद्य विक्रेतेदुकानाच्या ठिकाणी खाण्यासाठी रस्त्यावरील खाद्य विक्रेते कोणालाही सेवा देऊ शकणार नाही. सकाळी 7 पासून संध्याकाळी आठ पर्यंत पार्सल किंवा होम डिलीवरी सेवेलापरवानगी असेल. यासाठी वाहतूक करण्याची परवानगी असेल.प्रतिक्षित ग्राहकांना काउंटर पासून सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून उभा करता येईल.यामध्ये कार्य करत असलेल्या सर्वांनी भारत सरकारच्या नियमानुसार शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे.स्थानिक प्रशासनाने सीसीटीव्ही किंवा आपल्या मानव संसाधनाच्या माध्यमाने यावर नियंत्रण ठेवावे. नियमांचा उल्लंघन करताना आढळल्यास पाचशे रुपये दंड आकारावा.एखादा विक्रेता ग्राहकाला त्या ठिकाणी खाण्यासाठी सेवा देत असेल तर त्यालाही पाचशे रुपये दंड ठोठावला.नियमांचे उल्लंघन झाल्यास विक्रेत्यालाकोविडचा पूर्ण काळ संपेपर्यंत दुकान उघडता येणार नाही.जर स्थानिक प्रशासनाला असे वाटले की सदर चूक तो वारंवार करतच असेल आणि त्याला फक्त दंड लावून उपयोग नाही, तर त्याची दुकान तात्पुरती किंवा कोरोनासंपेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेता येईल. वृत्तपत्रे व नियतकालिकेवृत्तपत्रे /नियतकालिका/ पत्रिका यांचे मुद्रांक करून वितरण करता येईलफक्त होम डिलिव्हरी ला परवानगी असेलया व्यवसायात असलेल्या सर्व लोकांनी भारत सरकारच्या नियमानुसार शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे.मनोरंजन, दुकाने, मॉल ,शॉपिंग सेंटर इत्यादीसर्व सिनेमा हॉल बंद राहतील.नाट्यग्रह तथा थेटर पूर्णपणे बंद राहतील.उद्याने, व्हिडिओ गेम, पार्लर बंद राहतील.वॉटर पार्क सुद्धा बंद राहतील.क्लब, जलतरण तलाव, जिम, क्रीडा संकुले बंद रातील.या सर्व व्यवसायांशी संबंधित आस्थापनाने शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे.चित्रपट /चित्रवाणी /मालिका /जाहिरातींसाठीच्या शूटिंग बंद असतील.आवश्यक सेवा ना देणाऱ्या सर्व दुकाने, मॉल,शॉपिंग सेंटर बंद असतील.समुद्रकिनारे, उद्यान, खुली जागा सारखे सार्वजनिक ठिकाण बंद राहतील. स्थिती अनुसार याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेऊ शकतील.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web