पंढरपूर/प्रतिनिधी – वाढत्या कोरोनाचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी व कोविडच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पंढरपुरात विविध चार डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून अतिरिक्त 120 बेडचे कोविड हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांनी योग्य ती पावले उचलावीत अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी डॉक्टराना बैठीकित दिल्या.
पंढरपूर तालुक्यातील वाढत्या कोरोनाचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील खासगी डॉक्टर व ऑक्सिजन पुरवठा धारक यांची बैठक उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी नगर परिषदेत घेतली.या बैठकीस मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर,नगरपालिकेचे डॉ. बी.के.धोत्रे,डॉ. संभाजी भोसले,डॉ. कारंडे,डॉ.गुजरे,डॉ. सूरज पाचकडवे,डॉ. आरिफ बोहरी,डॉ. संजय देशमुख उपस्थित होते.
यावेळी प्रांधिकारी सचिन ढोले म्हणाले की,ऑक्सिजन पुरवठा रुग्णांना अखंडपणे सुरू राहील.तसेच रुग्णालयाचे ऑक्सिजन पुरवठा वेळेत होईल याची दक्षता ऑक्सिजन पुरवठा धारकांनी घ्यावी.यासाठी नियंत्रण अधिकाऱ्याचा सतत संपर्कात रहावे.कोविड सेंटर मधील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता वैद्यकीय सुविधेसाठी निमा संघटनेतील डॉक्टरांची मदत घेऊन होम असोलेशनची सुविधा निर्माण करावी.होम असोलेशनमध्ये असलेले नागरिक बाहेर फिरणार नाहीत याची काळजी नगर पालिका प्रशासनाने घ्यावी.त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.तसेच कोरोनाचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी सर्व खासगी व वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर,प्रशासन यांनी एकात्मिक प्रयत्न करावेत.असे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
अतिरिक्त 120 बेडचे क्षमता असलेले नवीन चार डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांनी आवश्यक ती कागदोपत्री कार्यवाही करावी.लाईफ लाईन हॉस्पिटलने पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्या उपचारासाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तात्काळ कार्यान्वित करावे.शहरातील लॅब धारकांनी रॅपीड अँटीजन तपासणी व आरटीपीसीआर तपासणीचे दर शासनाने ठरवून दिलेल्या नियमनुसार घ्यावेत.त्याबाबत दर पत्रक दर्शनी भागावर लावावेत.डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचे फायर ऑडिट व इलेक्ट्रिसीटी ऑडिट संबंधित रुग्णालयांनी करून घ्यावे.याबाबतची तपासणी नगर पालिका प्रशासनाने करून घ्यावी अशा सूचनाही ढोले यांनी यावेळी दिल्या.