कल्याण प्रतिनिधी – करोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.या मुळे येणाऱ्या प्रत्येक सणावर निर्बंध आले आहेत. त्यात १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हि संपूर्ण जगात साजरा होणारा मोठा सण आहे. पण मागच्या वर्षी प्रमाणे याही वर्षी कोरोनाचे सावट या सणावर आहे. पण या वर्षी आपण हि जयंती कोरोनाचे सर्व नियम पालन करून करूयात त्यासाठीच बुद्धिस्ट यूथ ऑफ कल्याण सिटी यांच्या वतीने आगळी वेगळी ऑनलाइन जयंती साजरी केली जाणार आहे. त्यात स्पर्धेचेहि आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी या आगळ्या वेगळ्या ऑनलाइन जयंती व स्पर्धेत सहभागी होऊन आपली जयंती घरीच साजरी करूयात. व कोरोना वर मात करूयात.
डीसीपी विवेक पानसरे यांचे जनतेला आवाहन
कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे यांनी जनतेला आवाहन केले आहे की बुद्धिस्ट युथ ऑफ कल्याण सिटी आयोजित “जयंती घरा घरात, जयंती मना मनात” भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ऑनलाइन जयंती निमित्ताने घरात राहून सुरक्षित राहून जनतेने या उपक्रमात सहभागी व्हावे.
जयंती चे स्वरूप व स्पर्धा खालील प्रमाणे
सेल्फी विथ फैमिली
आपल्या घरातील जयंती साजरी करताना सहपरिवार 1 सेल्फी फोटो.
रांगोळी स्पर्धा :-
आपल्या घराबाहेरील रांगोळी चा फोटो व रांगोळी काढताना व्हिडीओ।
चित्रकला स्पर्धा:-
महापुरुषांचे व्यक्ती चित्र फोटो व 2 मिनिटांचा व्हिडीओ
वय गट 5 ते 16 वर्ष
निबंध स्पर्धा :-
भारतीय संविधानातिल मानवतावादी मूल्य
(खुला गट)
कविता लेखन स्पर्धा :-
मानवतावादी व समतावादी मूल्य असलेली कविता
फॅन्सी ड्रेस स्पर्धा :-
महापुरुषांची वेशभूषा धारण करून एका पेपर वर त्यांचे विचार लिहून फोटो काढून पाठवावा
वरील स्पर्धा मध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव व पत्ता खालील क्रमांकावर व्हॉटसअप करावे.
कुमार कांबळे :- 9869377029
प्रवीण वाघ :- 9870081407
हर्षल बनसोडे :- 8097970985
सुशांत तिरपुडे:- 9769591391
सागर तायडे:- 8850 795 716
योगेश कांबळे:- +91 8850 799119