कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व नागरिकांच्या सेवा समस्यांकडे विशेष लक्ष देण्याचे भिवंडी महापौरांचे निर्देश

भिवंडी प्रतिनिधी – सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांनाच याच महिन्यात विविध धर्मीय सण , उत्सव सुरु होणार आहेत. मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. तसेच चैत्र पाडवा, राम नवमी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी सण उत्सव साजरे होणार आहेत. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे , तसेच सण उत्सवाच्या काळात साफ सफाई, औषध फवारणी, पाणी पुरवठा, याकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे अशा सूचना भिवंडी मनपाच्या महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी मनपा प्रशासनास दिल्या आहेत. यासंदर्भात गुरुवारी महापौर कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी प्रशासनास सदर आदेश दिले आहेत. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया, उपमहापौर इम्रान वली मोह.खान, स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे, अतीरीक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, कोनार्क विकास आघाडीचे गटनेते विलास पाटील, कॉग्रेसचे गटनेत हलीम अन्सारी, भाजपा गटनेते हनुमान चौधरी, उपायुक्त दीपक झिंजाड, उपायुक्त नुतन खाडे, शहर अभियंत लक्ष्मण गायकवाड तसेच सर्व प्रभाग समिती सभापती उपस्थित होते.           

शहरात वेळच्या वेळी सर्वत्र साफ सफाई, स्वच्छता, औषध फवारणी, कचरा कुंड्या साफ करणे, धुरीकरण, जंतुनाषक औषध फवारणी याकडे लक्ष द्यावे, तसेच सद्या उन्हाळा चालु आहे सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे. पाणी टंचाईच्या काळात टैंकर उपलब्ध करून देणे, कोरोनाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारे पाणी टंचाई किंवा अन्य नागरि सुविधा घेताना त्रास होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. शहरात कोरोना लसीकरण केंद्र वाढविण्यात यावीत. लसीकरणाची माहिती सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावी. कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे अशावेळी तातडीने रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. मुख्यालयात २४ तास एक संपर्क मदत कक्ष सुरू ठेवणे, प्रभाग समिती निहाय रुग्णवाहिका सेवा पुरविणे, नागरिकांना कोविड रुगणालयातील उपलब्ध खाटांची माहिती देखील देण्यात यावी. कोरोना लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेत नागरिकांना चांगल्या प्रकारे लसीकरण सोय उपलब्ध करून द्यावी. नागरिकांना सोयी म्हणून लसीकरण केंद्राबाहेर मंडप टाकणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. तसेच दोन महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. या पावसाळ्यापुर्वी करावयाची कामे देखील हाती घेण्यात यावीत. यामध्ये नालेसफाई, गटार सफाई, झाड छाटणी ईत्यादी कामे देखल हाती घेण्याचा सुचना महापौर प्रतिभा पाटील यांनी या बैठकीत प्रशासनास केल्या आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web