कल्याण प्रतिनिधी – रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मोहाली (पंजाब) येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये कल्याणच्या सेंट मेरी शाळेच्या ऋतुजा भालचंद्र सरवणकरने कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावणारी ऋतुजा ही यंदाच्या वर्षातील कल्याणची पहिली खेळाडू ठरली आहे.
तिने 9 ते 11 वयोगटांमध्ये 1हजार मीटर रेसमध्ये स्केटिंगच्या क्वाड प्रकारात कांस्यपदक पटकावत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ऋतुजा ही स्केटिंग अकॅडमी ऑफ इंडियाच्या क्लबमध्ये सराव करत असून तिला मोहित बजाज यांचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती कल्याणातील क्रिडा प्रशिक्षक अविनाश ओंबासे यांनी माध्यमांना दिली.