महाराष्ट्र्राच्या आध्यात्मिक राजधानीत रंगलाय निवडणुकीचा रिंगण सोहळा

सोलापूर/अशोक कांबळे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात पोटनिवडणूक लागली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कै.भारत भालके यांचे पूत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळाली आहे तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी मिळाली आहे.या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके व भाजपचे समाधान आवताडे यांच्यात तुल्यबळ लढत होईल असे मानले जात आहे.या निवडणुकीत एकूण 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरा मध्ये सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा रिंगण सोहळा रंगला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडणार की राहणार याची चर्चा रंगली असताना पंढरपूरच्या निवडणुकीत भाजपचे आमदार 105 वरून 106 होणार का अशी चर्चा रंगली आहे.
या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके भाजपाचे समाधान आवताडे,बहुजन विकास आघाडीच्या शैला गोडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे,वंचित बहुजन आघाडीचे बिराप्पा मोटे,महाराष्ट्र विकास आघाडीचे संजय माने,बळीराजा पार्टीचे राजाराम भोसले,बहुजन महापार्टीचे सिद्धेश्वर आवारे,अपक्ष सिद्धेश्वर आवताडे,अभिनेते अभिजित बिचकूले, संतोष माने,संदीप खरात,नागेश पवार,सुनील गोरे,सीताराम सोनवले,सुदर्शन खंदारे,कपिलदेव कोळी,सुदर्शन मसुरे,बिरुदेव पापरे हे 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
2019 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे भारत भालके यांनी 90,787 मते घेऊन विजय मिळवला होता.भालके यांचे प्रतिस्पर्धी सुधाकरपंत परिचारक यांना 75,623 एवढे मताधिक्य मिळाले होते तर अपक्ष उमेदवार समाधान आवताडे 54,124 मताधिक्य घेऊन तिसऱ्या स्थानावर होते.काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार उभा केला होता पण भारत भालके यांना मिळणाऱ्या मताधिक्यावर त्याचा परिणाम झाला नव्हता.या मतदार संघात लोकांचा जनाधार असणारे व 2019 साली एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणारे भारत भालके व सुधाकरपंत परिचारक या दोन्ही नेत्यांचे अकाली निधन झाले असल्याने जनता कोणाच्या पाठीशी उभी राहिली हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
सध्याच्या होत असलेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना मतदारांची भावनिक सहानभूती आहे.या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या शैला गोडसे याही विजयाचा दावा करीत आहेत.असे असले तरी शैला गोडसे व अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांच्या मताधिक्याचा फटका राष्ट्रवादी व भाजपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पण प्रत्यक्षात कोणाला फटका बसला. हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे,वंचित बहुजन आघाडीचे बीराप्पा मोटे यांच्या मताधिक्यावर भगीरथ भालके,समाधान आवताडे यांचा विजय अवलंबून असणार आहे.असे राजकीय विश्लेषकाना वाटते.भाजपचे समाधान आवताडे यांचा विजय परिचारक गटावर अवलंबून असून गेल्या निवडणुकीत परिचारक यांना मिळालेली मते समाधान आवताडे यांना मिळाली तर ते विजयाच्या समीप जावू शकतात.आवताडे यांचा विजय सर्वस्वी परिचारक गटावर अवलंबून असणार आहे.पंढरपूर मतदारसंघात प्रभावी गट असणारा कल्याणराव काळे यांचा गट कोणाच्या पाठीमागे उभा राहतो याच्यावर बरेचसे अवलंबून असणार आहे.कै.भारत भालके यांनी या मतदारसंघाचे गेली अनेक वर्षे नेतृत्व केले आहे. त्याचा फायदा भगीरथ भालके यांना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.असे असले तरी सर्वच उमेदवार विजयाचा दावा करीत आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web