भिवंडीतील मनपा शाळांतील विविध समस्या सोडविण्यासाठी आमदारांनी घेतली शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट

भिवंडी प्रतिनिधी – भिवंडीतील मनपा शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा व येथील मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख प्रयत्नशील असून नुकताच राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी भिवंडीतील मनपा शाळांमधील शैक्षणिक सुविधा व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार शेख यांनी चर्चा केली. त्याच बरोबर राज्यातील विद्यार्थ्यांकरिता सुरु केलेल्या करीअर पोर्टल बाबत सूचना देखील केल्या .               करियर पोर्टल मुळे विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी, विविध व्यावसायिक कोर्सेस, अनेक प्रकारच्या शिष्यवृत्यांविषयी माहिती तसेच विविध महाविद्यालये यांविषयी इत्यंभूत माहिती मिळत असून सदर माहीती ही एकूण आठ भाषांमध्ये उपलब्ध आहे. परंतु अशा या अतिशय महत्त्वाच्या करीअर पोर्टलची माहिती उर्दू भाषेमध्ये उपलब्ध नसल्याने आमदार शेख यांनी खंत व्यक्त केली असून मराठी आणि इंग्रजी पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर शाळांची संख्या असणाऱ्या उर्दू भाषिक विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणातील संख्या विचारात घेता सदर शासनाच्या महत्वाच्या माहिती पोर्टल पासून विद्यार्थ्याचा मोठा वर्ग वंचित राहत असून या पोर्टलवर उर्दू भाषेचा देखील समावेश करण्यात यावा अशी मागणी देखील आमदार रईस शेख यांनी शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे केली. त्याचबरोबर उर्दू मिड़ीएम विद्यार्थ्यासाठी लर्निंग डिस्याब्लीटी साधनांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची देखील मागणी केली आहे.            

 भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीतील महापालिका शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असताना इतर जिल्हामध्ये शिक्षकांची बदली करण्यात आली आहे त्यामुळे मनपा शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव असून शिक्षकांअभावी  गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याची बाब आमदार शेख यांनी निदर्शनात आणून दिली आहे. मनपा शाळांमध्ये विध्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वर्ग खोल्यांच्या गरज असतांनाही वर्ग खोल्यांचे बांधकाम अनेक वर्षांपासून करण्यात आलेले नाही. तसेच मनपाच्या अनेक शाळा इमारतीची दुरावस्था झाली असून त्या अनेक शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असून त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घना होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने या धोकादायक इमारती पडून त्या जागेवर नव्या सुसज्य शाळा इमारत बधण्यासाठी मनपा प्रशासनाला निधी व निर्देश देण्यात यावे तसेच इमारत बांधकाम करतांना येणाऱ्या अडचणींचा निपटारा शासन स्तरावरून करावा तसेच मनपा शाळांमधील मुख्याध्यापक पदोन्नती २०१४ पासून दिली गेली नाही ती देण्यात यावी अशा विविध मागण्या आमदार रईस शेख यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या भेटी प्रसंगी लेखी निवेदनाद्वारे केल्या आहेत. तर आपल्या मागण्या मंत्री मोहदया यांनी सकारात्मक घेत लवकरच त्यातील काही मागण्या मान्य करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्र्यांनी आपणांस दिले असल्याची प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web