अंबरनाथ प्रतिनिधी – अंबरनाथ येथील एका कंपनीच्या रासायनिक भूमिगत टाकीत साफसफाईसाठी उतरलेल्या ३ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हि घटना अंबरनाथ पश्चिम भागातील आयटीआय नजीक असलेल्या ईस्टर केमिकल कंपनीत घडली आहे. हर्षद , दिनेश,आणि बिंदेश असे रासायनिक टाकीत गुदमरून मृत्यू झालेल्या कामगारांचे नाव आहेत.अंबरनाथ पश्चिम भागात ईस्टर केमिकल कंपनी आहे. या कंपनीत भूमिगत गॅसच्या टाक्या असून या टाक्याना आतून रंग लावल्यासाठी मृत कामगांराना ठेकेदाराने सांगून कामाला नेले होते. आज सकाळी साडे आठ च्या सुमारास हे तिन्ही कामगार गॅसच्या टाकीला रंग लावण्यासाठी आदी साफसफाई करिता टाकीत उतरले होते. मात्र त्यांचा टाकीत जागीच गुदमरून मृत्यू झाला. खळबळजनक बाब म्हणजे या गंभीर घटनेची माहिती दुपारी ११ वाजता कंपनी व्यस्थापकाने अग्निशमन दलाच्या कार्यालयात दिल्यानंतर घटनास्थळी अग्निशमनचे जवान दाखल होऊन त्यांनी तिन्ही कामगारांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात रवाना केला आहेत.
घटनस्थळी अंबरनाथ पोलीस दाखल झाली असून पोलिसांनी पंचनामा करून पुढील कारवाई करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान तिन्ही कामगारांना कुठल्याही सुरक्षेची साधने न पुरवता त्यांना गॅसच्या टाकीत साफसफाईसाठी उतरवल्याचा निष्काळजीपणा केल्याचे समोर आले आहे. अधिक तपास अंबरनाथ पोलीस करीत आहेत.