एनआरसीची चिमणी जमीनदोस्त, एका इतिहासाचा अंत

कल्याण प्रतिनिधी – आंबिवली येथील आरसीसीचे बांधकाम असलेली चिमणी ज्यावेळी एनआरसी कपंनीचा प्रकल्प सुरु झाला त्यावेळी म्हणजे १९५० साली बांधण्यात आली होती. पण २००९ साली  कपंनी बंद पडली तेंव्हापासून धोकादायक झाली होती. चिमणीची या काळात वाताहत झाली होती.आंबिवली स्टेशनच्या शेजारी असलेल्या एनआरसी कंपनीमधील ५० मीटर उंचीची चिमणी टिटवाळा रोड वरील रहदारीला आणि आंबिवली स्टेटशन वरील प्रवाशांसाठी धोकादायक झाली होती ती आज सर्व सुरक्षेचे उपाय करून पाडण्यात आली.

रेल्वे, केडीएमसी व खडकपाडा पोलीस स्टेशन या सर्व सम्बंधित यंत्रणांनी ही चिमणी पाडण्यासाठी वेळोवेळी नोटीसा बजावल्या होत्या. एनआरसी कंपनी विरोधात एनसीएलटीमध्ये २०१८ मध्ये  दिवाळखोरी संहितेखाली दावा दाखल करण्यात आला. मार्च २०२० मध्ये एनसीएलटी ने दिलेल्या निकालानुसार अदाणी समूहाने सर्व प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबर २०२० मध्ये ताबा कंपनीचा ताबा घेतला.

अडाणी समूहाच्या प्रकल्प टीमने ही चिमणी पोलीस, केडीएमसी व एमईसीबी यांच्या सहकार्याने हि चिमणी उतरवली. यावेळी खडकपाडा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी टिटवाळा-आंबिवली रस्ता बंद केला होता व परिसरात सतत दोन दिवस गस्त घालून जनजागृती केली. ही चिमणी खाली आल्यावर रेल्वे व केडीएमसी अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.   कंपनीच्या आवारातील अन्य दोन आरसीसी चिमण्या व चार स्टीलच्या चिमण्याही लवकरच पाडण्यात येणार असून याठिकाणी अदाणी समूहाकडून जागतिक दर्जाचं लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा मास्टर प्लॅन बनवण्यासाठी रेल्वे व केडीएमसी सोबत चर्चा सुरु आहे. येथे किती हि मोठे प्रकल्प आले तरी या चिमणीच्या पाड कामानंतर एका इतिहासाचा अस्त झाला आहे हे नक्की.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web