डोंबिवलीतील कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर लॉचिंगच्या कामाला सुरुवात

डोंबिवली प्रतिनिधी – डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणा-या कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर लॉचिंगचा शुभारंभ आज महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे शुभहस्ते करण्यात आला. कोपर उड्डाण पुल धोकादायक झाल्यामुळे 15 सप्टेंबर 2019 पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. सदर पुल बंद असल्याने नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी कोविड-19 च्या संचार बंदीच्या काळात रेल्वे सेवा बंद असताना उड्डाण पुल पुर्नबांधणीचे काम महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशाने तातडीने हाती घेण्यात आले आणि 17 एप्रिल रोजी रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. सदर उड्डाण पुलासाठी 7 गर्डर आज डोंबिवलीत दाखल झाले. राजाजी पथ येथे सुरु असलेल्या कोपर ब्रिजच्या दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक पासून राजाजी पथ पर्यंत 3 टप्प्यात 3 गर्डर चढविण्यात येणार आहेत. या कामासाठी वाहतूक कोंडी होवू नये म्हणून रामनगर ते राजाजी पथ मार्गे डोंबिवली पूर्वेकडे जाणा-या सर्व वाहनांना रामनगर रिक्क्षा स्टॅण्ड पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आयरे गाव, आयरेरोड, डोंबिवली पूर्व परिसरातही राजाजी पथ मार्गे रेल्वे स्टेशन , रामनगर कडे येणा-या सर्व वाहनांना राजाजी पथ गल्ली क्र.1 च्या कडेला आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत/कोपर ब्रिज रेल्वे गर्डरचे काम होई पर्यंत प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.

आज पहिल्या फेज मध्ये 15 मिटरचे 7 गर्डर टाकले जातील आणि पुढच्या फेज मध्ये 12 मिटरचे आणखी 7गर्डर टाकले जातील आणि पुन्हा 18 मिटरचे 7 गर्डर टाकले जातील, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. याप्रसंगी आमदार रविंद्र चव्हाण, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली,कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, माजी पालिका सदस्य मंदार हळबे तसेच संबंधित कामाचे कंत्राटदार मे.पुष्पक रेल कन्स्ट्रक्शन प्रा.लि चे नविन वजरानी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web