कल्याण ग्रामीण तीन ठिकाणी दरोडा, लाखोंचा ऐवज लंपास,घटना सीसीटीव्हीत कैद

कल्याण प्रतिनिधी – कल्याण ग्रामीण भागातील कांबा गावातील पावशे पाडा भागात शुक्रवारी ता.  १९  रात्री ३ वाजेच्या सुमारास दरोडा टाकणारी नऊ जणांच्या टोळीने तीन घरांवर दरोडा टाकला आहे त्यात तब्बल चार लाखाचा ऐवज चोरीला केलेचे नागरिक सांगत आहेत . परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींचे चित्रीकरण झाल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेने परिसरात भीती चे वातावरण पसरले आहे  कल्याण ग्रामीण तालुका पोलिसांनी तपास सुरू केला आहे कोरोना महामारीत नागरिकांचे कंबरडे मोडले असतांना आता कल्याण ग्रामीण भागात तीन घरांवर दरोडा टाकून लाखोचा ऐवज लुटण्यात आला आहे.

कांबा गावातील पावशे पाडा भागात शुक्रवारी रात्री ३ते ३.३०  वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला आहे त्यात सुभाष राजाराम भगत यांच्या घरातून गंठंण , कानातील दागिने २.५० लाखाच्या आसपास ऐवज चोरण्यात  आला आहे . प्रकाश राजाराम भगत यांच्या घरातील मंगळसूत्र  तर हरिभाऊ धर्मा भोईर यांच्या ४० हजारांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला आहे या एकाच दिवशी परिसरात तीन ठिकाणी चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक उपसरपंच संदीप पावशे यांनी दरोडे खोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे आणि पोलिसांनी परिसरात गस्त मारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे त्याच बरोबर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोड्या खोरांचे चित्रीकरण झाल्याचे सांगितले आहे या घटनेत ९ जणांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे दरम्यान कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू वंजारी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन तपास सुरू केला आहे

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web