कल्याण प्रतिनिधी– घरात एकट्या राहणाऱ्या 47 वर्षीय महिलेला मारहाण करत गळा आवळून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिम कोपर रोड परिसरात उघडकीस आली आहे .आरती सकपाळ अस मृत महिलेचं नाव आहे .उदरनिर्वाहासाठी ती कल्याण मधील एक बार मध्ये वेटर म्हणून काम करत होती. लाॅकडाऊन मध्ये तिची नोकरी गेल्याने ती गेल्या काही महिन्यांपासून मच्छी विक्री करत उदरनिर्वाह करत होती. मयत आरतीच्या नातेवाईकानी तीला फोन केला होता मात्र फोन न उचलल्याने त्यांनी घरी जाऊन पाहिले असता त्यांना आरती मृतावतस्थेत आढळली .या प्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत हल्लेखोराचा शोध सुरू केलाय .दरम्यान काहीच सुगावा नसल्याने तिची हत्या का व कोणी केली ? या हत्येचा उलगडा करन्याच आवाहन पोलीस यंत्रणेसमोर उभ ठाकल आहे .