मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा

मुंबई प्रतिनिधी– मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा झाला. शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षात १८ हजार ३२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त १५ विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

मुंबई विद्यापीठात दूरस्थ शिक्षण प्रणालीतून ६४ हजार विद्यार्थी शिकत आहेत. सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शासनाच्या वतीने करण्यात येईल. यात दूरस्थ शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल. विद्यापीठातील ‘कमवा व शिका’ ही योजना आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. ही एक चळवळ निर्माण होण्यासाठी विद्यापीठांना शासनाचे सर्वतोपरी सहकार्य असेल, असेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या या पदवी वितरण समारंभात विविध शिक्षणक्रमातील १५ गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. आयडॉलच्या १८ हजार ३२१ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे. शाखानिहाय पदवी प्राप्त विद्यार्थी संख्या – मानव्य विद्याशाखा-४७००, वाणिज्य विद्याशाखा- १३००३, विज्ञान व तंत्रज्ञान-३८८-कौशल्यविकास विद्याशाखा २३० – एकूण १८३२१ पदवी प्राप्त विद्यार्थी संख्या आहे.

या कार्यक्रमाला पदवी वितरण समारंभाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. रविंद्र  कुलकर्णी, विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील उपस्थित होते. विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. प्रदीप कामथेकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर आयडॉल संस्थेचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. प्रदीप कामथेकर यांनी देखील आयडॉलमधून एम.ए.अभ्यासक्रमातून विद्यार्थी म्हणून पदवी प्राप्त केली. त्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web