केडीएमसीतील क प्रभाग अधिकारी,कर्मचारी लाच घेताना अटक

कल्याण प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांसह एकाला १५ हजारांची लाच घेतांना कार्यालयातच रंगेहात अटक करण्यात आली. अनधिकृत बांधकाम वर कारवाई टाळण्यासाठी लाच मागितली होती . कोरोना काळात लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे असे या घटने वरून दिसून येते . ठाणे लाचलुचपत विभागाने दोघांवर गुन्हा दाखल केला आहे।
प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे सह अनधिकृत बांधकामचे सुहास मढवी यांना १५ हजार रुपयांची लाच घेताना कार्यालयातच अटक करण्यात आली.सोमवारी संध्याकाळी  क प्रभाग कार्यालयात फिर्यादीने पैसे देताना ठाणे लाचलुचपत विभागाने सापळा रचून कार्यालयात पकडण्यात आले. कल्याण पश्चिमेतील मधील ठाणकरपाडा येथील चाळीतील १ प्लस १ चे काम करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली होती, त्यापैकी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे एसीबी ने कार्यालयातच रंगेहात पकडले त्यामुळे केडीएमसी मधील लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आकडा ३७ झाला आहे . 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web