विजतोडणी न थांबविल्यास मेणबत्तीसह ऑफिस देखील पेटविणार – मनसेचा इशारा

कल्याण प्रतिनिधी- वीज तोडणी विरोधात कल्याणमध्ये मनसेने अनोखे आंदोलन केले. अधिका:यांच्या केबीनमधील लाईट पंखा बंद करुन मेणबत्ती भेट दिल्या. इतकेच नाही तर वीज तोडणीची कारवाई थांबिवली नाही तर कार्यालय पेटवून देण्याची धमकी यावेळी मनसे पदाधिका:यांनी दिली आहे.

राज्यभरात वाढीव वीज बिलाविरोधात मनसे आणि भाजपने आांदोलन केलं. मात्र, सरकार किंवा महावितरण कंपनीवर त्याचा फारसा फरक पडला नाही. कल्याण-डोंबिवलीत देखील काही नागरीकांचा वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. याची माहिती मिळताच मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे त्यांच्या सहकाऱ्यांसह कल्याण पूर्व टाटा पॉवर नाका परिसरात असलेल्या वीज वितरण कार्यालयात पोहचले. महावितरणचे कार्यकारी अभियंता नरेंद्र धबड यांच्या कार्यालयात जाऊन या पदाधिकाऱ्यांनी केबीनमधील लाईट-पंखा बंद केला. जवळपास पाऊण तास मनसे पदाधिकारी अधिकाऱ्यांसोबत अंधारात चर्चा करीत होते. लाईट-पंखा नसल्याने नागरीकांना काय त्रास होतो हे अधिकारी वर्गास दाखवून दिले. नंतर धबड यांना मेणबत्ती भेट दिली.

महावितरणकडून सातत्याने घरगुती थकीत वीज बिल तोडणीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.  ग्राहकां पैसे जमा करण्यास तयार असताना सुध्दा महावितरणचे कर्मचारी ग्राहकांशी उद्घट भाषेत बोलत लोकांवर बिल भरण्यास बळजबरी करत आहेत. काही ग्राहक हे गावी असतांना त्याचे मीटर काढून नेत आहेत. वीजतोडणी मोहिमेत सुधार करून महावितरण कर्मचाऱ्यांना योग्य ती ताकीद द्यावी. बिलांच्या वसुलीला आमचा विरोध नाही पण ज्याप्रकारे दादागिरी ने व इंग्रजांप्रमाणे कारवाई चालू आहे त्याचा मनसेच्या वतीने जाहीर निषेध करत असल्याचे योगेश गव्हाणे यांनी सांगतिले. तर वीज तोडणीची कारवाई महावितरणने थांबविली पाहिजे. आज मेणबत्ती दिली आहे. उद्या मेणबत्तीसह महावितरणचे कार्यालयही पेटवून देऊ असा गंभीर इशारा मनसेने दिला आहे.

यावेळी मनसे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे, विधानसभा अध्यक्ष अनंता गायकवाड, मनविसे शहर अध्यक्ष निर्मल निगडे, विभाग अध्यक्ष उमेश पावशे, वाहतूक सेना सल्लागार गणेश सोनवणे, महेंद्र कुंदे, विलास गिरी,उपविभाग अध्यक्ष जितेंद्र वाघाचोरे, अंकूश राजपूत, मनवीसे उपशहर सतीश उगले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web