संपत्तीच्या वादातून खंजीर भोसकून चुलत्याची हत्या; आरोपी गजाआड

कल्याण प्रतिनिधी – पुतण्याने घरात घुसून चुलत्याची खंजीर भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम परिसरातील बेतूरकर पाडा भागात घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुतण्याला बेड्या ठोकल्या आहेत. हर्षल ठांणगे (२३) असे हत्याप्रकरणी अटक केलेल्या पुतण्याचे नाव आहे. तर नारायण ठाणगे, असे हत्या झालेल्या चुलत्याचे नाव आहे.मालमतेचा वाद विकोप्याला गेल्याने धक्कादायक घटना घडली आहे 
 

दूकानाच्या वादातून घडला प्रकार -मृतक नारायण यांच्यासह दोन भावांच्या नावाने बेतूरकर पाडा परिसरात एक भूखंड होता. हा भूखंड २०१२ साली एका बांधकाम विकासकाला इमारत बांधकामासाठी दिला होता. त्यांनतर बांधकाम विकासकाने ठरल्याप्रमाणे इमारतीमधील एक दुकानाचा गाळा तिन्ही भावांना दिला. मात्र, आरोपीचे वडील कुंडलिक यांनी या गाळ्यावर हक्क सांगितल्याने मृतक नारायण यांनी न्यायालयात आरोपीच्या वडिलांविरोधात दावा केला. याच वादातून आरोपी हर्षलने आज सकाळच्या सुमाराला चुलता नारायण यांच्या घरात घुसुन त्यांच्यावर धारदार खंजीरने वार केले. यामध्ये नारायण यांच्या मृत्यू झाला. तर वडिलांवर हल्ला होत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी नारायणचा मुलगा दिनेश बचावासाठी आला असता, आरोपीने त्यालाही खंजीर भोसकून गंभीर जखमी केले आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

काही तासातच आरोपीला बेड्या -घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलीसांचे पथक घटनस्थळी दाखल होऊन पंचनामा करीत नारायणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या रुख्मिणी बाई रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर पोलिसांनी याच परिसरातून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने हत्येची कुबली पोलिसांना दिली.दरम्यान हत्या नंतर तात्काळ सूत्र हलवीत आरोपीला काही तासात गजाआड केले त्यामुळे परिसरातील नागरिकांनी दहशत काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र  निर्माण झाले आहे त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर स्तुती सुमन उधळत कौतुक केले जात आहे .

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web